कंधार | प्रतिनिधी संतोष कांबळे
बहुजन समाजाच्या अडचणी आणि समस्यासाठी लढणाऱ्या अखिल भारतीय मातंग संघटनेच्या मराठवाडा सरचिटणीस पदी प्रा.पांडुरंग भाऊराव वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल साठेनगर कंधार येथील समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील समाजकार्यास शुभेच्छा देण्यात आल्या प्रा.पांडुरंग वाघमारे हे बाचोटी येथील महात्मा गांधी जुनियर कॉलेज येथे जीवशास्त्र (Biology) विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते समाजाच्या न्यायासाठी नेहमी अग्रेसर असतात.
बहुजन मातंग समाजाचे नेते क्रांतीसम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना करून मुंबईमध्ये जगेन तर समाजासाठी आणि मरेल तर मी समाजासाठी अशी प्रतिज्ञा घेतली आणि आयुष्यभर अखिल भारतीय मातंग संघ व भारतीय बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शासनाकडे अनेक मागणीसाठी अहोरात्र लढा देऊन अनेक विषयातून समजला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. अखिल भारतीय मातंग संघ व भारतीय बहुजन आघाडी संघटनेचे संस्थापक क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले (मा.राज्यमंत्री दर्जा) आणि अध्यक्षा क्रांतीज्योती श्रीमती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या अनमोल विचारातून त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या सेवेत कार्यरत राहणार असे प्रा. पांडुरंग वाघमारे म्हणाले यावेळी साठेनगर येथील शेषराव माळगे,बालाजी कांबळे, सुरेश निळकंठे,महेंद्र कांबळे,अंकुश कांबळे,उद्धव वाघमारे,निरंजन वाघमारे,अजिंक्य कांबळे, जनार्धन सूर्यवंशी,साईनाथ मळगे,रेणुकादास भिसे,ऋषिकेश कैलास कांबळे, प्रभाकर वाघमारे, राजू वाडीकर, मच्छिंद्र देवकांबळे,संतोष कांबळे हे उपस्थित होते.