कंधार : प्रतिनिधी
शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते छ.शिवाजी महाराज चौक यामुख्य रस्त्याचे काम मागील बऱ्याच महिन्या पासून चालू करण्यात आले आहे.परंतु हा रस्ता,नाली आणि फुटपाथ अंदाज पत्रका नुसार होत नसल्यामुळे ते काम अंदाज पात्रकानुसारच करावे.या मागणीसाठी महाराष्ट्र टि.व्ही.लाईव्हचे संपादक मयुर कांबळे यांनी दि. 24 जानेवारी पासून कंधार उपविभागीय कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
महाराणा प्रतापसिंह चौक ते छ.शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार होत नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ व नाली आहे.परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नाली व फुटपाथाचे बांधकाम अर्धवट ठेवून पूर्णतः बंद केले आहे.ते त्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत नाली व फुटपाथाचे काम करण्यात यावे तसेच सुलभ शौचालयाचे घाण पाणी दलित वस्तीकडे न वळवता तलावाकडे सोडण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र टि.व्ही.लाईव्हचे संपादक मयुर कांबळे यांच्यासह अनेकांनी दिले होते.परंतु संबंधित अधिकारी आणि प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले असल्यामुळे महाराष्ट्र टि.व्ही.लाईव्हचे संपादक मयूर कांबळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबविण्यात आलेली नाली व फुटपाथाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावर बांधकाम करून थाटलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे.अंदाजपत्रकानुसार काम न केल्यामुळे संबंधित कंत्राटदारांची बिले अदा करण्यात येऊ नये.संबंधित गुत्तेदार यांच्या कामाची जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अभियंता (पी डब्ल्यू डी) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्यात यावा.तसेच सदरील कामाची गुण नियंत्रक अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी.आदी प्रमुख मागण्या घेऊन दि. 24 जानेवारी पासून कंधार उपविभागीय कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले असून आजचा उपोषणाचा पहिला दिवस आहे.सदरील दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र टि.व्ही.लाईव्हचे संपादक मयूर कांबळे यांची स्वाक्षरी आहे.