
खा. चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द ; कोरोणा संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
नांदेड :
देशभरासह नांदेड जिल्ह्यातही कोरोणा चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. जिल्ह्यात कोरोणामुळे अनेकांचा बळी गेला असून अनेक जणांना कोरोणाची लागण झाली आहे .अशा परिस्थितीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला वाढदिवस आणि वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्याने वाढदिवस साजरा न करता covid-19 च्या नियंत्रणासाठी मास्क, सॅनिटायझर वाटप करावे असे आवाहन करण्यात आले आहे.नांदेड जिल्ह्याचे कणखर नेतृत्व तथा लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस येत्या दोन ऑगस्ट रोजी आहे. दरवर्षी खासदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक भागातील कार्यकर्ते ,भाजपाचे पदाधिकारी, खा. चिखलीकर यांच्यावर प्रेम करणारी असंख्य चाहते शुभेच्छा देण्यासाठी येत असतात .परंतु या वर्षी covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता आणि covid-19 मुळे ज्यांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होता यावे, यासाठी यावर्षी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही हार-तुरे , शाल, पुषगूछ,भेट वस्तू आणू नयेत तर covid-19 पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे मास्क आणि सॅनिटायझर पुरवठा करावेत. शासन आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या घरीच राहून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.