दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदाना साठी भाजपाने कंधारात रास्तारोको करुन केले एल्गार आंदोलन.
कंधार-
लॉकडाऊनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून दूर करण्यासाठी दुधाला प्रति लिटर दहा रुपये तर दूध पावडरला प्रति किलो 50 रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी भाजपच्या वतीने १ अॉगस्ट रोजी रास्तारोको करुन एल्गार आंदोलन करण्यात आले व तहसीलदारांना या बाबत निवेदन देण्यात आले.
दुधाची मागणी घटल्याने उत्पादन खर्च निघत नसून शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रति लिटर 10 रुपये अनुदान तसेच दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार कंधार यांच्याकडे केली आहे. तसेच या मागणीसाठी दि. 1 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी ,किसन मोर्च्या ,भाजपा महिला मोर्च्या यांच्या वतीने एल्गार आंदोलन करून तहसीलदार कंधार याना निवेदन देण्यात आले यावेळीभारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, भाजपा महिला मोर्चा चे जिल्हाध्यक्षा चित्राताई गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपा शहराध्यक्ष अॅड.गंगाप्रसाद यन्नावार, नगरसेवक सुनील कांबळे, मधुकर पा. डांगे, भाजपा महिला मोर्चा चे तालुकाध्यक्ष सौ. जयमंगला औरादकर, भाजपा महिला मोर्चा चे शहराध्यक्षा मीनाताई मुखेडकर, सुरेखाताई वडवळकर, बालाजी तोटावाड, व्यंकट नागलवाड, बालाजी पवार, निलेश गौर, श्रीराम जाधव, चेतन केंद्रे, प्रवीण बनसोडे, सागर डोंगरजकर, राजू लाडेकर,संभाजी घुगे,राजहंस शाहपुरे,आदींची उपस्थिती होती.