खा.प्रताप पा.चिखलीकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करणार-भगवान राठोड

खा.प्रताप पा.चिखलीकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करणार-भगवान राठोड

 कंधार
          नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार  प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा  2 आॕगस्ट रोजी वाढदिवस आहे.दर वर्षी खुप मोठ्या स्वरुपाचे कार्यक्रम घेऊन संपुर्ण जिल्हाभर वाढदिवस साजरा केला जातो.यावर्षी जगभरात कोरोनाचे व्हायरस या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे.नांदेड जिल्ह्यातही दोन हजाराच्या जवळ पाॕजिटिव्ह रुग्णाची संख्या झाली असुन 80च्या जवळपास रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता खा.चिखलीकर यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहिर केले असुन विनाकारण खर्च टाळुन सामाजिक उपक्रम राबवण्याचे अहवान केले आहे.या अहवानाला प्रतिसाद देऊन कंधार भाजपच्या वतिने सामाजिक उपक्रम राबवुन खा.प्रताप पा.चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहीती भाजप तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिली आहे.
खा.प्रताप पा.चिखलीकर  2 ऑगस्ट ला वाढदिवस आहे.दरवर्षी कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला जातो.दरवर्षी भव्य किर्तनाचा कार्यक्रम ही घेतला जाता. खा.प्रताप पा.चिखलीकर यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी व हितचिंतक, वाढदिवसाची वाट बघत असतात , दरवर्षी कंधार लोहा तालुक्यासह  संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोना सारख्या जागतिक महामारी च्या संकट लक्षात घेता आपला वाढदिवस घरच्या घरी साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाचे संकट पहाता कोन्ही हार-तुरे आणु नका.विनाकारण खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्यक्रम राबवुन व गरजुवंताना मदत करा असे अहवान केले आहे.त्यामुळे कंधार भाजपच्या वतिने  तालुक्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवड, मास्क  चे वाटप व सॅनिटायझर चे वाटप अशा पद्धतीचे उपक्रम संपूर्ण तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे वतिने राबवण्यात येणार आहेत.कार्यकृर्ते आपापल्या गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करणार आहेत .तालुक्यातील विविध भागात वृक्षलागवड करून वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामध्ये  बारूळ,कौठा ,सर्कल ,पेठवडज, फुलवळ ,कुरुळा कंधार, उस्माननगर सह तालुक्यातील सर्व व सर्कल निहाय कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबऊन वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन कंधार तालुका भाजपच्या वतिने करण्यात आल्याची माहिती कंधार भाजप तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिली आहे.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *