वासना आणि प्रेम* व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी

 

 

प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, म्हणून माणसाने माणूस जोडावा, प्रेम हे वाईट गोष्ट नाही, प्रेमाशिवाय आपले जीवन पूर्ण नाही पण वासना व प्रेम यातील फरक मुला मुलींना कळणे. हे महत्त्वाचे आहे. जीवनाला सुखाची आंतरिक आनंदाची झालर लागते ती माणुसकीमुळे, प्रेम, जिव्हाळा ,परोपकार नसेल तर जिवंत असून काय कामाचे? स्वार्थ ,पैसा, आत्मकेंद्रित वृत्ती यामुळे भौतिक सुख उपभोगता येतील पण आंतरिक समाधान हवे असेल तर जगण्यातलं खरंच चैतन्य तुम्हाला राहावे
वाटत असेल तर प्रेमाचा झरा जिवंत असायलाच हवा, ज्यांची निवड योग्य आणि आयुष्यभर दोघांचे जुळून येणे संसार शेवटाला जाणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मुला- मुलींनी एकमेंकाविषयी आकर्षण वाटणारच? कारण ते विषमलिंगी आहेत, ते नैसर्गिक भावना त्यांना आहेत, पण स्वतःवर ताबा ठेवणे हे तेवढेच आवश्यक आहे. केवळ तुम्ही एखाद्या भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही, मानवी जीवनामध्ये काही पुरुष अतिशय निखळ मनाने इतरांवर प्रेम करतात. त्या पद्धतीने त्यांच्यासोबत वागतात, पण काही स्त्री- पुरुष या धावपळीच्या युगात घराबाहेर राहतात,काहीजण स्त्रीला एकटीला गाठून नोकरीच्या ठिकाणी भेटून तिचे लैंगिक शोषण करण्याची हौस करून घेतात. त्यालाच वासना म्हणतात. मानसिक विकृतीमुळे ब-याच जणी या वाममार्गाला बळी पडतात. म्हणून मुलींनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे. रात्री अपरात्री काळोख पडल्यावर निर्जन ठिकाणी एकटी जाऊ नये,किंवा फसवणूक करणाऱ्या मैत्रिणीबरोबर सुद्धा जाऊ नये, खाऊ किंवा भेट वस्तू कोणाकडून घेऊ नयेत अयोग्य मित्र निवडू नयेत

,नवरात्र व गणेशोत्सवाच्या किंवा आणखी काही कार्यक्रमात उशिरापर्यंत घराबरोबर राहु नये. पालकांनी मुलींना सर्व समजून सांगावे. प्रेमाचा स्पर्श व वासनेचा स्पर्श तिला कळायला हवा पुरुषी नजर तिला समजायला हवी तिच्याशी मोकळा संवाद साधावा, तिला न रागवता तिची समस्या जाणून घ्या, तिला बोलू द्या. तिचे विचार ऐकून घ्यावे, तिने बोललेले जे आहे, त्याची शहनिशा करा ,कदाचित तिचं बोलणं उद्याच्या धोक्याची घंटा सुद्धा असू शकते .
म्हणून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, ती छोटी आहे तिला काय कळते असे बोलून नामानिराळे होऊ नका. वेशभूषा, केशभूषा आधुनिक फॅशनच्या नावाखाली अंग प्रदर्शन यामुळे पुरुष जवळ येतात,

म्हणून वासना निर्माण होईल असे कपडे वापरू नका. विकृत रूप धारण करू नका , सर्वांना चांगले दिसेल, आपल्या संस्कृतीचे जतन होईल. असेच तुम्ही वागा. प्रेम हे सर्वांना कळते. कृष्णाचे राधेवर, विठ्ठलाचे रुक्मिणीवर, शेतकऱ्यांचे जमिनीवर आई-वडिलांचे आपल्या मुलांवर, सैनिकांचे देशावर ,शिक्षकांचे विद्यार्थ्यावर असे अनेक प्रेम आहेत. यात कसल्याही वासना नाहीत.ते
सोज्वळ, निर्मळ, निखळ प्रेम आहे त्यातले फरक तुम्हाला समजून घ्यावे लागतील, सध्या वर्तमानपत्रातून, मासिकातून, दूरदर्शन वरून महिलांचे लैंगिक शोषण आपण ऐकत असतो, फक्त या गोष्टीला पुरुषच जबाबदार आहेत असे म्हणता येणार नाही.
टाळी एका हाताने वाजत नाही, म्हणून सर्वांनीच चांगल्या पद्धतीने वागावे. अपवादात्मक काही मुलींना वातावरणाशी झुंज द्यावी लागते.

काही मुली खरोखरच जुडो- कराटे खेळलेल्या असतात त्यामुळे त्यांच्याकडे वाकडी नजर करून बघण्याची काही जणांची ताकद नसते. परंतु काही मुली हळव्या असतात त्या सहज स्मितहास्य करून बसतात. मुलांना वाटते खरंच आपल्याला ती बोलते मग प्रेम बाजूला राहून जाते. आणि मनात वासना निर्माण होते. त्यामुळे प्रेम आणि वासना यातला फरक ओळखावे, चित्रकार आपल्या चित्रावर प्रेम करतो, बहीण आपल्या भावावर प्रेम करते, ते प्रेम आहे कुठेतरी अनोळखी माणूस भेटून एकमेकांना मोबाईलवर बोलून गोड गोड बोलून, *केवड्याचं पान तू* ,
हसल्याने काय छान दिसतेस ?असं बोलून तसेच तूच माझा जीव की प्राण, म्हणून काहीजण फसवे आश्वासन देतात,*काळ बदलला चित्र बदलले. आज तुलाही बदलावं लागणार आहे. कारण तू उमलती कळी आहेस.
तुला कोणीही कुस्करून टाकू नये. त्यासाठी तू रणरागिनी बनून रणचंडीकेचं रूप धारण कर, वेळ पडल्यास दुर्गा हो* वासनेच्या बळी पडू नकोस.एवढेच मला सांगायचं आहे. सध्याच्या काळात आपण घर सोडून बाहेर नोकरी करतो यातून मैत्री वाढत जाते,मर्यादेचे उल्लंघन सुद्धा होते, वासना निर्माण होऊन लैंगिकेतेकडे वयानुसार आकर्षण जाते, त्यामधूनच फूस लावून पळून नेले जाते .
अशा बातम्या समाज माध्यमात प्रसारित होतात, वयात आलेल्या मुला मुलींनी एकमेकांना अश्लील फोटो दाखवने, ब्लॅकमेलिंग करणे, कुसंगत घडने, पाकीटमनीचा दुरुपयोग करणे, आई-वडिलांनी दिलेल्या पैसा उधळून टाकणे, तेव्हा काहीतरी वाईट घडण्याची दाट शक्यता असते हे सत्य पण कटू आहे , आई-वडिलांपासून दूर असणाऱ्या मुली, वस्तीगृहात, आश्रमामध्ये राहणाऱ्या मुलींच्या बाबतीमध्ये सध्या बरंच ऐकायला मिळते, आई-वडिलांशी मनमोकळे बोला ,त्यांच्या तुमच्यात अंतर ठेवू नका, धीर सोडू नका, काहीही लपवू नका, सत्य सरळ सांगा, जीवन हे अनमोल आहे, देवदासी मुरळी परितक्त्या, घटस्फोटीत महिला मतिमंद मुली, अनाथ मुली यांच्यावर बऱ्याच वेळेस अतिप्रसंग घडतो आणि त्याचे परिणाम नंतर जाणवतात यावरील महिलावर फक्त वासनेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते असे मला वाटते.

प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो. म्हणून आपल्या आई-वडिलांना भावांना आपल्याबद्दल काय झालं हे तुम्ही सांगा. वासनाधीन लोकांच्या अमिषाला बळी पडू नका,*तू खूप सुंदर दिसतेस* हे वाक्य बोलून बरेच जण आपल्या मनात काय आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करतात,
किंवा तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे. असे बोलून त्याच्या मनातून आपल्या मनात येण्याचा प्रयत्न करतात.
हे वय पंधरा ते अठरा वर्षाचे असतो.
या वर्षात काहीही होऊ शकते,
मित्रांचे बोलणं चांगलं वाटतं, कुठे थांबावं हे कळत नाही सुंदर कपडे, आकर्षक मेकअप ,केशभूषा ,नटणं, मुरडणं तीन-तीन वेळेस आरशात पाहणं या गोष्टी केल्या जातात ,
त्यामुळे प्रेमाचे रूपांतर नंतर वासनेत होते, आणि त्याचे मग परिणाम पुढे भोगावे लागतात. मुलींनो समाजामध्ये असं वर्तन करा की कधीच तुम्हाला चारित्र्यावरून कोणी बोलू नये
चारित्र्य हे लाख मोलाचे आहे.
गेलेली संपत्ती आपण परत मिळू शकतो ;परंतु एकदा गेलेले चारित्र्य परत कधीच मिळवता येत नाही
.म्हणून शूरवीर व्हा, हिरकणी , सावित्रीबाई फुले,रमाई आंबेडकर जिजाऊ भोसले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ,झाशीची राणी लक्ष्मीबाई सुनीता विल्यम्स.कल्पना चावला यांचे आदर्श तुम्ही पुढे ठेवा यांच्या जीवनावर प्रेम करा तेव्हाच आपल्या मध्ये बदल झाला आहे,
असे तुम्हाला या दिनाच्या निमित्ताने सांगायचे आहे.

 

*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *