Post Views: 82
नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आज दि. १९ रोजी सकाळी अकरा वाजता पौर्णिमोत्सव आणि शिवजयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून याच कार्यक्रमात उज्ज्वल प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण होणार आहे तसेच आंध्रप्रदेशातील विजयवाडा धम्मसहलीवरुन परतलेल्या आंबेडकरी अनुयायांचा सत्कार सोहळा व शहरातील गंगा काॅलनी, पंचशील नगर आणि श्रमसाफल्य नगर येथील बौद्ध उपासक उपासिकांकडून भव्य भोजनदान देण्यात येणार असल्याची माहिती येथील अखिल भारतीय भिख्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
दरमहा पौर्णिमेनिमित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन १९ तारखेला करण्यात येते. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना भिख्खू संघ अभिवादन करणार आहे. तसेच कंधारच्या उज्वल प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्यरत्न व विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला भदंत पंय्याबोधी थेरो व भिख्खू संघासह समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, प्रा. विलास वाठोरे, एस. एन. गोडबोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष रणजीत गोणारकर, प्रशांत गवळे, रुपाली वागरे वैद्य, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर यांची उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, शहरातील देगाव चाळ येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सत्कार होणार असून पौर्णिमोत्सव कार्यक्रमांतर्गत सकाळपासूनच परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, ध्यानसाधना बोधीपुजा, पुरस्कार वितरण, भोजनदान, धम्मदेसना, पुरस्कार वितरण, बुद्ध भीम गितांचा प्रबोधनपर कार्यक्रम, दान पारमिता आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. आगामी काळात याच परिसरात श्रामणेर दीक्षाभूमी भव्य धम्मसंकल्प स्तूप उभारण्यात येणार आहे. यात उपासकांच्या दानातूनच ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, विपश्यना केंद्र, भिक्षू निवास, भोजनव्यवस्था, धम्मदेसना सभागृहाची निर्मिती होणार आहे. तेव्हा सढळ हाताने दान करावे आणि पौर्णिमोत्सव कार्यक्रमासाठी जिल्हा व परिसरातील बौद्ध उपासक, उपासिकाश्रामणेर प्रशिक्षण केंद्रात शिवजयंती व पौर्णिमोत्सव बालक बालिका, आंबेडकरी प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
″