नांदेड.दि.२५(प्रतिनिधी)-हिंदी-मराठी भाव संगीतातील अग्रगण्य नांव म्हणजे पद्मश्री सुरेश वाडकर … आज महोत्सवाच्या पुर्वसंध्येला संगीत शंकरदरबारच्या मंचावरून गाणार म्हणून यशवंत महाविद्यालयाकडे रसिकमंडळीनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.नियोजित वेळेच्या तासभर आधी अर्धाअधिक मंडप भरला होता.पं. सुरेश वाडकर व त्यांच्या कन्या अनन्या वाडकर कार्यक्रमस्थळी येताच नांदेडकर रसिकांनी जागेवर उभे राहून त्यांना अभिवादन केले.
उद्घाटन समारंभ…
संगीत शंकरदरबारच्या पुर्वसंध्येला आयोजित ‘ओंकारस्वरुपा’ सुगम संगीत कार्यक्रमाचे उद्घाटन कु.सुजयाताई व कु.श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. स्वर्गीय शंकरराव चव्हाण व कुसूमताई चव्हाण यांच्या प्रतिमांचे पूजन चव्हाण कुटूंबीयांकडून करण्यात आले. पुष्पाताई पाटील, शीतलताई भोयर, रेखाताई चव्हाण,नरेंद्र दादा चव्हाण यांची उपस्थिती होती. पं.सुरेश वाडकरांचे स्वागत अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कु.सुजया व कु.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते पार्श्वगायिका संपदा गोस्वामी,अनन्या वाडकर ,मयुरेश शेरलेकर (तबला) जितेंद्र साळवी (ढोलक)संतोश दिवेकर,प्रसाद नायक,अमित गोष्टी वाडीकर(तालवाद्य) प्रथमेश साळूंके (बासरी,)अजय तायडे गिटार,कुणाल रेगे(निवेदन) यांचे स्वागत करण्यात आले.उद्घाटन समारंभाचे सुत्रसंचालन प्रा.विश्वाधार देशमुख यांनी केले.