आधुनिक स्त्री . … स्वातंत्र्य की स्वैराचार

महिला दिनानिमित्त १ ते ८ मार्च मी सीरीज लिहीणार आहे त्यासाठी माझ्या वाचकांकडुन , चाहत्यांकडुन विषय मागवले होते .. जवळपास ६०/७० अतिशय सुंदर विषय आले आहेत..
त्यातला हा विषय माझा मित्र डॉक्टर आनंद कुलकर्णी याने दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्याची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते..

अनेक वर्षांपुर्वीचा इतिहास पाहिला तर स्त्रीला स्वातंत्र्य होतं.. Karma Returns again हा नियम प्रत्येक जीवाला लागु आहे तसाच तो स्त्री बाबतीतही असावा. अनेक वर्षे स्त्रीच्या भावना दाबल्या गेल्या म्हणुन त्या आता उफाळून आल्या असं म्हणावं तर त्याचा अतिरेक झाला असं म्हणावं लागेल..ऋग्वेद काळात अनेक उदाहरणे स्त्री स्वातंत्र्याची आहेत . ७० च्या दशकात सोवळी स्त्री असायची , नवरा गेल्यावर तिचे केस काढुन तिला विद्रूप केले जायचे.. त्यानंतरचा मधला काळ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ ज्यावेळी पंडीता रमाबाई , सावित्रीबाई फुले , महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह , स्त्री शिक्षण , स्त्रीयांना मतदानाचा अधिकार या सगळ्यासाठी लढून स्त्रीला अनेक गोष्टी मिळवुन द्यायला मदत केली म्हणजेच काय तर तिला स्वातंत्र्य मिळवुन दिलं असं आपण म्हणुयात पण स्त्री अधिकाराने स्वातंत्र्य झाली .

 

खरं तर तिने विचाराने स्वातंत्र्य व्हायला हवे होते. कदाचित विचार स्वातंत्र्य दिलंही नाही आणि स्त्रीने ते मिळवलही नाही.. कारण स्वातंत्र्याचा नेमका अर्थ आजही स्त्रीला उमगला नाही..
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला नेमका अर्थ २०२४ मधे सुध्दा स्त्रीला कळलाच नाही असं म्हणणंही वावगं ठरणार नाही.. स्त्रीने शिक्षण घेतलं , प्रत्येक क्षेत्रात स्त्री वावरु लागली , पुरुषांच्या खांद्याला खांदा न देता ती त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करु लागली परिणामी अहंकार आला.. रावणालाही अशाच अहंकाराने मारलं..

 

आता रावणरुपी स्त्री जेव्हा स्वतःचं अस्तित्व सिध्द करु लागली तेव्हा पुरुषप्रधान संस्कृती आपलं अस्तित्व शोधु लागली आणि यातुन पुढे येतोय तो कलह आणि घटस्फोट रुपी रावण जो संपूर्ण कुटुंब व्यवस्थेला पोखरु लागला आहे.. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात पुसटशी सिमा रेषा आहे ज्या रेषेने सीतेचाही बळी घेतला होता.. ती लक्ष्मण रेषा होती कारण सितेचा दिर तिच्या मागे श्वासारखा उभा होता आणि कलियुगात उभा आहे रावण जो आपल्या डोळ्यावर झापडं लावुन उभा आहे..

 

भिरभिरणाऱ्या वाऱ्यासारखी स्त्री व्यसनात , विवाहबाह्य संबंधात उडु लागली आहे कारण तिला स्वातंत्र्य मिळाले आहे याचवेळी आपले स्वैर वागणे हे समाजासाठी घातक आहे हे तिच्या लक्षातच येत नाही. सोशल मिडीयाने यात भर पडली म्हणावं तर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करणं हे आपल्याच हातात आहे.. जिच्या हातात पाळण्याची दोरी होती तिच्या हातात आता दारुचा ग्लास आला आहे.. सिगरेट हातात घेउन नाक्यावर उभी राहुन ती शायनिंग मारत आहे.. याच का त्या सावित्रीच्या मुली ??. हा प्रश्न समोर आवाचुन उभा आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण आपल्या मुलीना रसातळाला घेउन निघालो आहोत याचं भान स्त्रिला असायलाच हवं.. याचच एक उदाहरण म्हणजे पुण्यात टेकडीवर घडलेली घटना.. वाईट गोष्टी पटकन कशा काय आत्मसात केल्या जातात आणि चांगल्या गोष्टीकडे आपण सहज दुर्लक्ष करतो ही शोकांतिका आहे.
मी तुळशीपुढे दिवा लावते किवा घरात धुप पेटवते यावर एक स्त्री हसली आणि मला म्हणाली , सोनल तु कुठल्या युगात वावरतेस गं ??.. चल पब ला जाऊ. आयुष्य एकदा मिळाले आहे एंजॉय कर गं.. या तिच्या बोलण्याची किव आली.. स्वतः नोकरी करत असल्याने भरपुर पैसा आहे.. कधीही कुठेही जाण्याची मुभा आहे.. नवऱ्याला उलट उत्तर देणं असेल , सासु सासरे घरात नको..

 

किवा इथुन पुढे तर मुलंही नकोत म्हणणाऱ्या मुली आहेत कारण जबाबदारी नको.. लिव्ह इन रीलेशनशिप आलं आणि लग्नसंस्कृती नष्ट होइल की काय अशीही भिती निर्माण व्हायला लागली आहे..
स्त्रीने नोकरी , व्यवसाय करायलाच हवा , तिने शिक्षण घ्यायलाच हवे , तिने व्यक्त व्हायलाच हवं, तिने स्वतःवर प्रेम करायलाच हवं पण हे सगळं हवं असताना तिने काही गोष्टी करायलाही नकोत त्यावर जरुर काम करावं.. पुरुषांना कमी लेखुन पुढे जाण्यापेक्षा आत्मसन्मानासाठी तिने काहीना काही करावे आणि घर दोघांनी सांभाळावे.. व्यसनं , होटेलींग , व्यायाम न करणे या सगळ्यापासुन तिने आणि पुरुषांनीही दुर रहावे..

 

नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात पण त्या पुरुषांवर वरचढ होण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या प्रगतीसाठी कराव्यात..
अध्यात्म जाणून घ्यावं म्हणजेच आपल्या मुलांना याचं ज्ञान देता येइल.. उत्तम विचाराने , स्वतः केलेल्या आहाराने , व्यायामाने स्वतःला निरोगी ठेवुन संपूर्ण कुटुंब निरोगी ठेवावे..

लक्झरीला महत्व न देता प्रामाणिकपणाला महत्व द्यावे..
गॉसीपींग न करता सामाजिक काम करावे
अशा अनेक गोष्टीनी आपण आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेउन स्वैराचाराला दुर ठेवु शकतो.. अनेक मुद्दे यात घेता येतील पण माझ्या वाचक सखीनी यातील योग्य वेचुन त्यावर विचार करुन , संगत बदलुन वागावे आणि स्वतःसोबत कुटुंब आणि समाज याचाही विचार करावा..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *