नांदेड : स्व. यशवंतराव चव्हाण हे लोकोत्तर नेते होते. द्रष्टे शासनकर्ते आणि प्रशासनकर्ते होते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शेती, शिक्षण, सामाजिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली. आधुनिक महाराष्ट्र घडवणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनी, दि. 12 मार्च 2024 रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री. अनिल शेंदारकर साहेब यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,
मुकुंद मुळे, सिद्राम रणभिरकर, विठ्ठल आडे, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे राजेश मेथेवाड, जोगिंदर बुक्तरे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.