(कंधार/मो सिकंदर)
कंधार येथील मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठान संचलित छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व कलाविष्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराने घडवून आणला हुबेहूब शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा! हा सोहळा पाहून उपस्थित पालक व श्रोते यांच्या डोळ्याचे पारणे फिटले असे ऐकावयास मिळत होते.
विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त कला गुणांची वाढ व्हावी, आणि त्यांच्या अंगीअसलेल्या विविध कला गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात स्टेज कॅरिअर निर्माण होऊन आत्मविश्वासाने जगता यावे, या दृष्टिकोनातून सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डोळ्याचे पारणे फिटेल असा छत्रपती शिवरायांचा हुबेहूब राज्याभिषेक सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे विशेष.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा च्या अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रण्यताताई देवरे / चिखलीकर, प्रमुख अतिथी नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा पानभोशीच्या सरपंच राजश्रीताई मनोहर पाटील भोसीकर, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ पुरुषोत्तम धोंडगे,प्रा डॉ. मनिषाताई पुरुषोत्तम धोंडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कंधार शहरातील नामांकित असलेल्या छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूमध्ये दि. ९ मार्च २०२३ रोज शनिवारी सायंकाळी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यात एल. के.जी. चिमुकल्यांसह ८ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले, तर विविध सामाजिक संदेश देणारे सादरीकरण केले,मोबाईलचे दुष्परिणाम काय याचा संदेश दिला तर शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळाचा देखावा अंगावर शहारे येतील असे डोळ्याचे पारणे फिटेल अश्या प्रकारे सादरीकरण केले. हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले होते.
यावेळी पालकांची विशेषता महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा व पत्रकारांचा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ने – आन करणारे वाहन चालक यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सौ.मीनाताई जोगदंड सरपंच गुलाबवाडी ,प्रा.विद्याताई फड, उत्तम भांगे, गुरुनाथ पेठकर, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. फराना मॅडम यांनी केले तर माजी सरपंच तथा उपाध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे माधवराव पेठकर यांनी आपल्या पहाडी आवाजात सूत्रसंचालन केले.