महिला दिन संपला पण वयात येणाऱ्या मुलींच्या पालकांना रोज नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे..
समस्या कि वस्तुस्थिती ??
जुन्या पिढीने बदलण्याची गरज की ??
,,,,, मला मुल होवु द्यायचे नाही ही
माझ्याच फ्रेंड्सच्या २ मुलींची सेम डीमांड.. नक्की काय बदलत चाललय ?? .. मानसिकता ??..१५० करोड लोकसंख्या झाली त्याचं बर्डन ??.. नोकऱ्या नाहीत , कसदार अन्न नाही.. प्रदूषण की रोज नवनवीन आव्हाने ??.. हजारो प्रश्न आणि उत्तर ??.. नवीन पिढी चुकतेय म्हटलं तर ती प्रॅक्टीकल आहे असं मला वाटतं कारण या जगात मुलांना द्यायला आहे काय ?? हा प्रश्न माझ्या मैत्रीणीच्या मुलीने उपस्थित केल्यावर तिच्याकडे तिला द्यायला उत्तर नाही.. भरमसाठ वाढणारी बांधकामं, सिमेंटीकरणामुळे वाढलेली उष्णता , पाण्याचा तुटवडा, ओस पडत असलेली खेडी त्यामुळे शहरांवर येणारा ताण आणि त्यात जर वारस हवा किवा आई बाबा व्हायचे आहे हा विचार करणं कितपत योग्य आहे.. ही पिढी वाया गेली म्हणण्यापेक्षा अनेक मुलं समाजाचा आणि व्यवस्थेचा विचार करत आहेत.. मला वैयक्तिक विचाराल तर उद्या माझ्या मुलीने हा निर्णय घेतला तर मी तिला सपोर्ट करेन.. दत्तक मुल हाही उत्तम पर्याय मी तिला सुचवेन कारण एका मुलाचं संगोपन केल्याचं पुण्य मिळेल आणि त्या मुलाला चांगलं घर ,
शिक्षण मिळेल.. माझ्या माहीतीत मी अशी अनेक जोडपी पाहिली , मुल होत नाही म्हणुन दत्तक घेत नाहीत पण ट्रीटमेंटचा मारा करुन मानसिक आणि शारीरिक रुग्ण होतात.. गोळ्यांमुळे किडनी फेल होते पण तरीही दत्तक मुल हा पर्याय ते निवडत नाहीत.. आपण सहज नव्या पिढीला दोष देतो पण आपण संस्कार करायला कमी पडलो हे आपण स्विकारत नाही..
आता प्रश्न येतो तो म्हणजे आपल्या पिढीचा.. आपण आपला हेकटपणा सोडत नाही .. आपल्याला वाटतं आपणच बरोबर .. दुसरा अजून एक विचार केला तर आपल्या पिढीला कुठे नातवंडांवर संस्कार करायचे आहेत ?? .. त्यांना कुठे वेळ आहे ??. त्यांना त्यांच्या वयातील मित्रमैत्रीणीसोबत पार्ट्या करायच्या आहेत..त्यांनी त्यांची मुलं वाढवली त्यामुळे आता त्यांना एंजॉय करायचा आहे.. मुलगा सुन दोन्ही नोकरी करतात किवा आताची ती गरज आहे मग मुलांना पाळणाघर.. तिथे आजी आजोबासारखे संस्कार थोडीच मिळणार आहेत..
मानसिकता नक्की कोणाची बदलली आहे ??.. कटु आहे पण सत्य आहे.. पुण्यातल्या होटेलमधे आजी आजोबाचे अनेक घोळके दिसतात याला कारण सून स्वयंपाक करत नाही हे आहे कीं यांना होटेलींग करायचे हे आहे.. कटु आहे पण सत्य आहे.. प्रत्येकजण बदललाय.. प्रगती की अधोगती हा प्रश्न इथुन पुढे कायम भेडसावत रहाणार कारण आपण चांगलं सोडुन पाश्चिमात्यांचं अनुकरण करु लागलो आहोत.. तिथे घरातुन जसं किचन गेलं तसं L वरुन xxxl वर सगळे जाऊन पोचले.. आता भारतात सेम झालय.. कारण किचन बंद आणि होटेल फुल्ल.. आपण संपूर्ण देशाला सुधरवु शकत नाही पण आपलं स्वतःचं घर नक्कीच सुधरवु शकतो.. फक्त डीग्रीज असून उपयोग नाही तर बदलणाऱ्या सामाजिक घटनानुसार आपण स्वतःला बदलणं यातच शहाणपणा आहे.. मुल होवु न देणं , लैगिक समस्या , घटस्फोट , मासिकपाळी नियमीत न येणं, नोकरी नसणं , लिव्ह इन , वंध्यत्व , विभक्त कुटुंब पध्दती या सगळ्यामुळे आपण उच्च शिक्षीत असुन अशिक्षीत आहोत कारण वैचारिक लेव्हल आणि मानसिकता याचीच कमतरता आहे असं मला वाटतं..
सोच बदलो.. देश बदलेगा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi