कंधार : प्रतिनिधी
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे घेता येतील .100% राज्य पुरस्कृत योजना असून या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध आकारमानानुसार आठ प्रकारचे शेततळे घेता येतील यामध्ये जास्तीत जास्त 75 हजार रुपये एवढे अनुदान देय आहे त्यामुळे कंधार तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शाश्वत सिंचनाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी शेततळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते यांनी केले.
शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या नावावर कमीत कमी 0.40 हेक्टर ऐवढी जमीनधारणा असणे आवश्यक आहे .
सदरची योजना महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर महाडीबीटी प्रणालीवर त्वरित अर्ज करावा ऑनलाईन सोडत पद्धतीने निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात येईल पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः काम पूर्ण करणे आवश्यक आहे .
कंधार तालुक्यामध्ये या आर्थिक वर्षात आतापर्यंत लाभार्थी शेतकरी सुमारे 24 शेततळे पूर्ण झाले आहेत. महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर महाडीबीटी प्रणालीवर त्वरित अर्ज करावा. जास्तीत जास्त शेतकर्यांना लाभ होईल –
कंधार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते