न्याय आतातरी सारखा पाहीजे..


न्याय आतातरी सारखा पाहिजे
अन् सुदामासही द्वारका पाहिजे !

मी निघालो पुढे या क्षणापासूनी
जिंकण्याला कुठे तारखा पाहीजे ?

दोस्त झाली मने, थांबल्या दंगली
मग सुऱ्याला पुन्हा धार का पाहिजे ?

लोकशाही तुझी ही जगावेगळी
दारूबंदी सवे बार का पाहिजे ?

सत्यनारायणा मी उपाशी इथे
पंडिताला तुझ्या खारका पाहीजे !

शेवटी जायचे त्याच एका घरी
वेगळे वेगळे दार का पाहिजे ?


ज्ञानेश वाकुडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *