महाराष्ट्राचा ढासळता सांस्कृतिक वारसा

छत्रपती शिवाजी महाराज…रयतेचा राजा…महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत! शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी काढले की आपल्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर दाटून येतो, छाती अभिमानाने फुलून येते. हे महाराष्ट्राच्या जनतेचे आणि मराठी मातीचे भाग्य की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी अनेक गड कोट बांधले, अनेक गड जिंकले आणि दुरवस्था झालेल्या अनेक किल्ल्यांची डागडुजी करून ते सुस्थितीत आणले. ह्याशिवाय काळाच्या फार पुढचा विचार महाराजांनी केला आणि सागराकडून परकीय शक्तींचे आक्रमण रोखण्यासाठी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे जलदुर्ग सागरी सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी बांधले. थोडक्यात महाराजांनी दूरदृष्टीने अशा ठिकाणी किल्ले बांधले किंवा जिंकले ज्यांच्या माध्यमातून त्यांना राज्यकारभार करता येईल व राज्यातील सर्व भागांकडे लक्ष ठेवता येईल.
           महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले विविध गड आणि किल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव व महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. काही अपवाद वगळता महाराष्ट्रातील या गड-किल्ल्यांची दूरवस्था झाली असून त्यांची डागडुजी, जतन आणि संवर्धन याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. नव्या पिढीला अपवाद वगळता या गड-किल्ल्यांची फारशी माहितीही नाही. आजच्या पिढीला या गड-किल्ल्यांची माहिती करून द्यावी, देदिप्यमान इतिहास उलगडून दाखवावा ही काळाची गरज आहे. 

          छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था पाहून आमदार राजू पाटील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या सध्याच्या अवस्थेची माहिती नावासह राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. प्रतापगडावर दरड कोसळून तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. विशाळगड, पन्हाळगडावर पडझड झाली आहे. विजयदुर्गची तटबंदी ढासळली आहे. हे सगळं पाहिल्यावर छत्रपतींचे नाव घ्यायची खरंच आपली योग्यता आहे का? असा प्रश्न पडतो, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे. याचबरोबर, पुरातत्व खाते केंद्राकडे आहे, त्यामुळे आपण काहीच करणार नाही अशी बोटचेपी भूमिका महाराष्ट्र सरकार घेणार असेल तर हा इतिहास नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. तसेच, छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, असे म्हणत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत.

                 महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, दुर्गसंवर्धन खाते निर्माण करावे व भरीव निधीची तरतूद करून केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करावा, प्रत्येक किल्ल्यावर संबंधित किल्ल्याचा इतिहास व माहिती मिळण्याची व्यवस्था करावी, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे असलेल्या सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक असावे, कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या असंरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने, त्याठिकाणी राज्य व केंद्रीय पातळीवरनिधी उपलब्ध न होऊन संवर्धन होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने हा दुर्गाडी किल्ला संरक्षित करावा‌ आमदार राजू पाटील यांनी अशा काही  मागण्या केलेल्या आहेत. 
               छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण शिवरायांची जी खरी स्मारकं आहेत ती आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही, अशा शब्दांत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

              महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या नसनसातून ज्याचं नाव उच्चारल्याबरोबर वीरश्रीचा संचार होतो. एखाद्या गडावर, पायथ्याशी ‘हरहर महादेव’ साधे उच्चारले तरीही अंगामध्ये रोमरोम शहारून जातो,तेव्हा अभिमानाने शब्द बाहेर पडतात…
”हा देश नवरत्नांची खाण,इथेच झटले शिवरायंचे प्राण,सह्याद्रीच्या शिखरावरती फडके भगवे निशाण.”
परंतु मनात शंका यायला लागते स्वाभिमान असणारे हे स्वराज्याचे निशाण काळाच्या ओघात नष्ट तर नाहीत ना होणार ? कारण मुस्लीम राजवटींच्या आक्रमणापासून महाराष्ट्रातील जनतेच ज्या गड किल्ल्यांनी संरक्षण केलं,छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले,स्वराज्याचा कारभार ज्या गडकिल्ल्यावरून चालला त्या गडकिल्ल्यांची अवस्था बघितली तर मन तिळतीळ तुटतं.वाढलेले गवत, काटेरी झुडूप,पडलेल्या भिंती,ढासळत असलेले बुरुज , छपर उडालेली मंदिर,दुर्गंधी सुटलेली तलावातील पाणी,अक्षरशः कचराकुंडी झालेले किल्ले. हा आहे आपल्या शिवरायांचा वारसा ? हेच दाखवणार आहोत का आपण पुढच्या पिढीला ?
                या वास्तूंची अशी दुरावस्था होण्याचे आणखी एक कारण आहे. जेव्हा जेव्हा या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा तो काही अपवाद वगळता तडीस जात नाही असा आज पर्यंतचा अनुभव आहे. बरेच गड हे पुरात्तव विभागाच्या  अखत्यारीत येत असल्याकारणाने ASI च्या गतीने आणि नियमांच्या चौकटीनुसार हे काम सुरु राहिले पाहिजे. 

राज्यातले ऐतिहासिक गड किल्ले ही इतिसाहाची साक्ष देणारी आणि तरुण पिढीसाठी नेहमीच स्फूर्तीदायक राहिलीत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची दूरवस्था झालीय. या भर पडली आहे ती प्रतापडाची. प्रतापगडीवरील सूर्य बुरुज ढासळतोय. शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असणा-या आणि अफझलखान वधामुळं प्रसिद्ध झालेल्या प्रतापगडावरही पडझड होतेय. या किल्ल्यावरील महत्वाच्या अशा सूर्य बुरुजाकडं दुर्लक्ष झाल्यानं पावसामुळं तो ढासळलाय. इतर अन्य चार बुरुजही शेवटच्या घटका मोजतायत.  त्यामुळं शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्ल्याचा वारसा जपणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

                कोकणातील समुद्रातील मूरूज-जंजिरा, विजयदुर्ग, मालवण, जयगड यांच्यासह किनारपट्टीवरील मंडणगड, बाणकोट, रायगड आदी आणि अन्य राजगड, पुरंदर, सिंहगड , फत्तेगड या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने एक एक भक्कम बुरूज ढासळत आहे.त्यामुळे या किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दगडामातीचे गड-किल्ले केवळ वास्तू नाहीत. देशाच्या इतिहासाला कलाटणी दिलेल्या असंख्य प्रसंगांचे ते मूक साक्षीदार आहेत. पराक्रमाची जाज्ज्वल्य परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा वारसा तर सर्वांनाच प्रेरित करतो. या किल्ल्यांच्या संवर्धनाचा खरा अर्थ राज्य पुरातत्व विभाग अन् दुर्ग संवर्धन समितीला कळावा अशीच इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे.
               महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग संवर्धन समिती स्थापन झाली खरी, पण कामाला म्हणावा तसा वेग नाही. शेवटी नोकरशाहीसमोर काहीच चालत नाही हेच खरं’ ही हताश प्रतिक्रिया आहे इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांची. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी नियुक्त केलेल्या गड-किल्ले संवर्धन समितीचे बलकवडे प्रमुख मार्गदर्शक आहेत. समितीच्या उपाध्यक्षांची खंत किल्ल्यांच्या दिवसेंदिवस ढासळत असलेल्या बुरूजांचे खरे कारण मानली पाहिजे. महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य इतिहास जतन करावा आणि नव्या पिढ्यांना आदर्श परंपरा सांगावी या उद्देशाने स्थापन केलेला राज्य पुरातत्व विभाग नावाचा पांढरा हत्ती शासन पोसत आहे. ऐतिहासिक स्थळांच्या माहितीचा अभाव व कामाबाबत उदासीनता या विभागात ठायीठायी दिसते. प्रत्येकवेळी निधीचा मुद्दा मांडून हात झटकण्याचे कसब मात्र अधिकाऱ्यांना साधले आहे. या नाकर्तेपणामुळे गड-किल्ल्यांची अतोनात हानी सुरू आहे. राजस्थानचे अवघे पर्यटन किल्ल्यांवर अवलंबून आहे. प्रत्येक किल्ल्याचे जतन करण्यासाठी राजस्थान सरकारने कमालीची मेहनत घेतली. देश-विदेशातील पर्यटक या किल्ल्यांच्या प्रेमात पडतोच, इतके काम लक्षणीय आहे. उलट स्थिती महाराष्ट्रात आहे. 

                  छत्रपती शिवरायांचे वास्तव्य असलेल्या वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. पण, किल्ल्यांची अवस्था पाहून निराश होतात. सुस्थितीतील किल्ले नसल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. कारण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ किंवा राज्य पुरातत्व विभागाने कधीच किल्ल्यांचे ‘मार्केटिंग’ केले नाही. किल्ल्यांचे संवर्धन म्हणजे नेमके काय करायचे याचा उलगडा अजूनही झालेला नाही. शिवाय प्रत्येक क्षेत्रातील मंडळ व समित्यात जेमतेम वकुबाची मंडळी नेमण्याचा आदर्श ‘पायंडा’ दुर्ग संवर्धन समितीतही कायम राहिला. फक्त किल्ल्यांची नावे माहिती असल्याच्या निकषावर काही दुर्ग ‘अभ्यासक’ समितीत विराजमान झाले. किल्ल्यांचे बांधकाम आणि संवर्धनाच्या अभ्यासात अगदीच पहिल्या यत्तेत शिकणारे सदस्य कसे काम करतील याबाबत इतिहासप्रेमींच्या मनात धाकधूक आहेच. शिवाय सर्वपरिचित किल्ले संवर्धनाला प्राधान्य आहे. त्यामुळे मराठवाड्यासारख्या प्रदेशातील अनेक किल्ले उपेक्षितच राहण्याची शक्यता जास्त. औरंगाबाद जिल्ह्यातील अंतूर, जंजाळा, वेताळवाडी या दुर्गम किल्ल्यांपर्यंत कुणीच पोहचत नाही. तर कंधार, नळदुर्ग, उदगीर, परंडा किल्ल्यांची दूरवस्था वर्णनापलीकडची आहे.  इतिहासाचे साक्षीदार मूकपणे मातीत एकजीव होत असताना प्रशासकीय यंत्रणेला सोयरसुतक नाही. पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, विकासकामे सदोष झाल्याने इतिहासाचा ठेवा विद्रुप झाला आहे. अंतूर किल्ल्याचे बांधकाम याचे उदाहरण ठरावे. प्रवेशद्वार आणि तटबंदीच्या कामासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च झाला आहे. 

            बाणकोटचा भुईकोट किल्ला, मंडणगडचा गडकिल्ला तसेच पेशव्यांच्या दरबारी असणारे व पानिपतच्या लढाईसारख्या मोठया आघातानंतर बुद्धीच्या जोरावर मराठी साम्राज्याला सावरून धरणारे पेशव्यांचे फडणवीस श्री. बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांचे मूळगाव वेळास आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे असा ऐतिहासिक वारसा मंडणगड तालुक्याला लाभला आहे.
               मंडणगड शहरापासून केवळ चार कि. मी. अंतरावर व समुद्रसपाटीपासून ४०० मीटर अंतरावर पूर्वीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या असणा-या किल्ले मंडणगड या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी इच्छा व प्रयत्न नवयुवक तरुण मंडळ व मंडणगडवासीयांचा आहे. अनेक वर्षे या किल्ल्याकडे शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र मंडणगड तालुक्याला लाभलेले निसर्गसौंदर्य व इतिहासपूर्ण वास्तू साऱ्यांचेच आकर्षण ठरत आहे.
            कोकणभूमी म्हणजे परमेश्वराने निसर्गसौंदर्याची केलेली उधळण, त्याचप्रमाणे या भूमीला तितकाच जिवंत किल्ल्यांचा इतिहास आहे. मंडणगड तालुका जिल्ह्याच्या एका टोकाला असून याच तालुक्याच्या सीमेपासून छत्रपती शिवरायांची राजधानी समजला जाणारा रायगड जिल्हा सुरू होतो. रत्नागिरीतील नऊ तालुक्यांमध्ये एकूण २७ किल्ल्यांचा समावेश आहे. 

               ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या सातार्‍यातील गड, किल्‍ले, ऐतिहासिक स्थळे शूरविरांच्या शौर्यगाथेची ओळख करुन देतात. मात्र, सध्या सातार्‍यातील ऐतिहासिक वास्तूंची दूरवस्था होत चालली आहे. छत्रपती आप्पासाहेब भोसले यांच्या काळात बांधलेल्या ‘कमानी हौदाची’ देखील  पालिकेच्या दुर्लंक्षामुळे दुर्दशा झाली आहे.  या हौदाचा परिसर अस्वच्छ झाल्यामुळे इतिहास प्रेमींकडून याबाबत नाराजी व्यक्‍त होत आहे. 

 छत्रपती आप्पासाहेब महाराज यांच्या काळात नागरिक व जनावरांच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून राजपथावर इ.स १८४० मध्ये ‘कमानी हौद’  बांधण्यात आला. या हौदामध्ये अदालत वाड्याच्या पाठीमागे असलेल्या नागझर्‍यातून थेट पाईपलाईन होती. मात्र नंतरच्या काळात इमारती वाढल्यामुळे कमानी  हौदाला नागझर्‍यातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. नंतर सातार्‍यात नगरपालिका झाल्यानंतर तेथे कमानी हौदाजवळ मोठी टाकी बांधून तेथे पाणीपुरवठा केला जाई. २००१ साली पालिकेतर्फे या हौदाचे सुशोभिकरणही करण्यात आले होते.  मात्र त्यानंतर काही वर्षानंतरच या ऐतिहासिक वास्तूकडे पालिकेचे  दुर्लंक्ष झाले.
                  आता कमानी हौदामध्ये अस्वच्छता पसरली आहे. परिसरात असलेल्या चहाच्या टपर्‍यांचे ग्लास, प्लॅस्टिक पिशव्या, कागदे दिसून येतात. परिसरातील काही व्यावसायिक खरकटे तेथेच टाकतात. त्यामुळे तेथे लावलेली झाडेही सुकत आहेत. कमानी हौदाच्या परिसरात झाडे वाढली आहेत. त्यामुळे तेथील बाकड्यावर नागरिकांना बसता येत नाही.  बाकडे धूळखात पडलेली आहेत. हौदामध्येही अस्वच्छता पसरली आहे. परिसरात गवत वाढले आहे. कमानी हौदाकडे पालिकेचेे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी तेथे फिरकणे बंद केले आहे.  पालिकेच्या दुर्लंक्षतेमुळे शहरातील अशी ऐतिहासिक स्थाने दुर्दशेच्या गर्तेत सापडली आहेत. 
         विविध कारणांवरून वाद उकरून काढले जातात. त्यामुळे वादंग माजतात.  एकीकडं इतिहासावरून वाद होत असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने जे गडकिल्ले जिंकले त्यांची आता दूरवस्था होऊ लागलीय. प्रताप गडाची तशीच अवस्था झालीय. प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला मराठी माणसासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिलं आहे. मोठ्या सैन्यदलासह चाल करून आलेल्या अफजल खानाचा खात्माही छत्रपतींनी याच गडावर केला होता. त्यामुळे इतिहासात प्रतापगडाला मोठं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा वारसा सांगणाऱ्या या गडाची मात्र गेल्या काही वर्षात मोठी दूरवस्था झालीय. पावसामुळे प्रताप गडाची पडझड सुरु झालीय. प्रताप गडावरील ऐतिहासिक सूर्य बुरुजही आता ढासळलाय. पूर्वी या बुरुजावरून शत्रूची टेहाळणी केली जात असे. राजमाता जिजाऊसाहेबांच्या  राजवाड्यासमोर हा बुरूज उभारण्यात आला होता. मात्र, आता हा बुरूज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शिवकाळात मोठं महत्त्व असलेल्या या बुरुजाची ही अवस्था झालीय. शासनाचं या पडझडीकडं जराही लक्ष नाही आणि त्यामुळेच हा ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. सूर्य बुरुजाप्रमाणेच प्रताप गडावरील इतर बुरुजांचीही मोठी दुरावस्था झालीय.–राज्यातले ऐतिहासिक गड किल्ले ही इतिसाहाची साक्ष देणारी आणि नवीन पिढीसाठी नेहमीच स्फूर्तीदायक राहिली आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची आज दूरवस्था झालीय. सिंहगड हा देखील त्यापैंकीच एक आहे. आलिकडच्या काळात सिंहगडावरील कल्याण दरवाजाची मोठी पडझड झालीय. छत्रपतींच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या या किल्ल्याची पडझड होत असताना सरकारकडून मात्र त्याची दखल घेतली जात नाही. कल्याण दरवाजाची डागडुजी करावी म्हणून इतिहासप्रेमींनी सरकार दरबारी वारंवार  पत्रव्यवहार केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पुरातत्व खात्याने त्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळेच काही इतिहासप्रेमी संघटनांना कल्याण दरवाजाच्या दुरुस्तीचं काम हाती घ्यावं लागलं होतं. पावसाळ्यात गडावरचे रस्ते निसरडे झालेले असतानाही इतिहासप्रेमींनी कल्याण दरवाजाच्या डागडुजीचं काम केलं. सिंहगडावर शिवप्रेमींनी अशाप्रकारे स्वयंस्फुर्तीने दुरुस्तीचं काम केलं असलं तरी इतरही गडावर अशाच प्रकारे काम होण्याची आवश्यकता आहे.

 ब्रिटिशांनी केलेल्या तोफांच्या माऱ्यात रायगडावरील आधीची बांधकामं नेस्तनाबूत झाली होती. हल्ल्यामुळे लागलेल्या आगीत बराच भाग जळून खाक झाला होता. यात भर म्हणजे १८४२ मध्ये त्या परिसरात नोंदवलेली अतिवृष्टी आणि १८६४ मधला भूकंप. एकंदर  १८१८ ते  १८९५ पर्यंत सुमारे ७० वर्षं रायगडाकडे दुर्लक्ष झालं. नंतर टिळकांनी पुढाकार घेतल्यामुळे आणि ब्रिटिश इंडिया पुरतत्त्व खात्याकडे काम गेल्यामुळे रायगडाच्या जतनाचं काम सुरू झालं.

                  पुढे हे काम भारतीय पुरतत्त्व विभागाकडे  आलं. पण या ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली, असं अजिबात म्हणता येणार नाही. रायगड किल्ला भारतातील मध्ययुगीन दुर्गबांधणीचा उत्तम नमुना आहे. काळाच्या ओघात वेगवेगळ्या राजवटींनी या दुर्गाचा वेगवेगळा उपयोग करून घेतला. टेहळणीची चौकी ते अभेद्य राजधानी असा प्रवास रायगडानं केला. मध्ययुगात जगभरात दुर्ग बांधले गेले. सुरक्षेसाठी दुर्ग हे त्या काळातलं वैशिष्ट्य आहे. जगातल्या प्रत्येक ठिकाणी दुर्ग बांधण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या. त्यांचा अभ्यास करून त्या काळातल्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो. हे किल्ले आज संरक्षणासाठी उपयोगाचे नसले, तरी ते गत काळाची आठवण सांगतात. त्यातून आपण अनेक गोष्टी समजू आणि शिकू शकतो. त्यांचं जतन करणं आपलं आद्य कर्तव्य असलंच पाहिजे.

            रायगड हा शिवप्रेमींसाठी एक प्रेरणास्रोत आहे. प्रतिदिन शेकडो इतिहासप्रेमी गडाला भेट देत आहेत. रोपवे असला तरी पायरी मार्गाने गडावर जाण्यास अनेक जण प्राधान्य देतात. दोन तास पायपीट करून गडावर गेल्यानंतर मात्र अनेकांचा भ्रमनिरास होतो. गडाची निर्मिती ते आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती देणारे साधे फलकही गडावर लावण्यात आलेले नाहीत. यामुळे किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे अवशेष पाहून व गाइड सांगेल तेवढीच माहिती घेऊन परत फिरावे लागत आहे. राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ११ एप्रिलला गडावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये याविषयी अधिकृत घोषणा केली जाणार आहे; पण भाजपा सरकारने दोन वर्षांपूर्वी पाचाडमध्ये १०० एकर जमिनीवर जिजाऊसृष्टी उभारण्याची घोषणा केली होती, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे गडावर फक्त घोषणाबाजी होणार की प्रत्यक्ष आराखडा सादर करून विकासाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, याकडे देश-विदेशातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. रायगड हा शिवप्रेमींचे प्रेरणास्रोत आहे. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रोज शेकडो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत. गडावर जाण्यासाठी रोप वेची सोय असली तरी तरुणांसह वृद्ध इतिहासप्रेमी पायरी मार्गाचा अवलंब करूनच गडावर जाण्यास प्राधान्य देत आहेत. दोन तास पायपीट केल्यावर किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो; पण तो फार काळ टिकत नाही. येथील दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली जात आहे. गडावर जाणाऱ्या नवख्या पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. रायगडची निर्मिती कशी झाली. येथे कोणत्या लढाया झाल्या. हिरोजी इंदलकरांनी गडाचे बांधकाम परिपूर्ण होण्यासाठी नक्की कोणते तंत्र वापरले. वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून त्याची रचना नक्की कशी झाली. लढाया कशा झाल्या हे जाणून घेण्यासाठी लोक येतात, अभ्यासक येतात. 
            गडावर जाण्यासाठी रोप-वे ची सोय असली तरी तरुणांसह वृद्ध इतिहासप्रेमी पायरी मार्गाचा अवलंब करूनच गडावर जाण्यास प्राधान्य देत आहेत. दोन तास पायपीट केल्यावर किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो; पण तो फार काळ टिकत नाही. येथील दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली जात आहे. गडावर जाणाऱ्या नवख्या पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. रायगडची निर्मिती कशी झाली. येथे कोणत्या लढाया झाल्या. हिरोजी इंदलकरांनी गडाचे बांधकाम परिपूर्ण होण्यासाठी नक्की कोणते तंत्र वापरले. वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून त्याची रचना नक्की कशी झाली. गडावर झालेली युद्धे, विविध घटना, घडामोडी यांच्या सनावळीसह सर्व तपशिलाचे माहितीफलक उपलब्ध होतील, अशी अपेक्षा असते; पण प्रत्यक्ष गडावर गेल्यानंतर फक्त छोटीशी पाटी लावलेली पाहावयास मिळते. या पाट्यांव्यतिरिक्त काहीही माहिती उपलब्ध होत नसल्याने पर्यटक निराश होत आहेत.रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये सद्यस्थितीमध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे; पण गडावर आताही भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तलाव व विहिरींची सोय करण्यात आली आहे. हे नियोजन कसे करण्यात आले. खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई देऊळ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर्त तलाव, वाघदरवाजा टकमक टोक, हिरकणी बुरूज या सर्व ठिकाणांची सविस्तर माहिती देणारे फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे

राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करून किंवा लग्न समारंभांसाठी भाड्यानं देण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या. यावरून राज्यभर संतापाची लाट पसरली. इतिहासप्रेमी, राजकीय विरोधक यांच्यासह सगळ्यांनीच राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. किल्ले संवर्धनाची सरकारची ही पद्धत म्हणजे शिवरायांचा अपमान आहे. जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते या सरकारने पाच मिनिटात करून दाखवलं, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले होते. 

           राज्यातील १५० ते २०० किल्ले असे आहेत, जे भग्न अवस्थेत आहेत, त्यांचा विकास करायचा सरकारचं धोरण आहे. जेणेकरून या सर्व किल्ल्यांची देखभाल करता येईल. बाकी सगळ्या राज्यांनी अशीच योजना राबवली आहे,” त्यांनी पुढे सांगितलं. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या राजवाडा परिसराची दुरवस्था झाली असून, संपूर्ण राजवाडा परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. या गवतामुळे राजमहाल ओळखणेही कठीण झाले आहे. पुरातत्त्व विभागाचे या वास्तूकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
पाचाड येथील राजमाता जिजाऊंची समाधी आणि राजमहाल असा मिळून सुमारे १४ एकरचा विस्तीर्ण परिसर आहे. मात्र ज्या वाड्यात जिजाबाई राहत होत्या त्या परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. एखाद्या माहितगार व्यक्तीच्या मदतीशिवाय राजवाडा ओळखणेही कठीण झाल्याचे पर्यटक सांगतात. राजमहालाकडे जाणाऱ्या मार्गावरही गवत उगवले असून, नागरिकांना चालायला वाटही शिल्लक नाही. राजमहलाबाहेरील तटबंदीला गवताने वेढले आहे. राजमहाल परिसरात गुरांचाही वावर असतो. महालातील पायऱ्यांचे दगडही अनेक ठिकाणी निखळले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वराज्य रक्षणार्थ सागरी नाकेबंदीची नितांत आवश्यकता आहे, ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने हेरली आणि अरबी समुद्रात सागराच्या लाटा झेलणारा सिंंधुदुर्गचा किल्ला उभा केला. छत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत आज हा जलदुर्ग डौलाने उभा आहे; पण शासनाचे दुर्लक्ष आणि पुरातत्त्व विभागाची उदासीनता यामुळे साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व आणि दरवर्षी ढासळत चाललेली तटबंदी पाहता या समृद्ध शिवलंकेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

                   संस्कृती व पर्यटनाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत शासन आणि पुरातत्त्व विभाग उदासीन आहे. ढासळत चाललेले बुरूज, पडझड झालेली तटबंदी, वैराण माळरान, जीर्ण ऐतिहासिक ठेवे, मंदिरांची दुरवस्था, सोयी-सुविधांचा अभाव, प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बकाल चित्र पर्यटकांमार्फत जगासमोर जात आहे. हे बदलण्याची मागणी होत आहे.
       सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी १६९५ मध्ये स्थापन केलेले एकमेवाव्दितीय, असे शिवछत्रपतींचे मंदिर आहे. हेच खरेखुरे शिवछत्रपतींचे स्मारक आहे. या स्मारकाची जपणूक व्हावी. शिवप्रेमींच्या मागण्या ह्या सिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावा, मंदिर आणि ऐतिहासिक ठेव्यांचा जीर्णोद्धार व्हावा, किल्ल्याची पडझड थांबवावी, किल्ल्यावर प्रशस्त उद्यान बांधावे, किल्ल्यावर वृक्ष लागवड करावी, कोकण किनारपट्टी बोट सुुरू करावी,  विजयदुर्ग किल्ल्याचा डिसेंबर २००५मध्येसाजरा होणारा अष्टशताब्दी सोहळा लक्षात घेऊन, २००३मध्ये राज्याच्या पर्यटन महामंडळाने आखलेल्या जलदुर्गविकास योजनेंतर्गत विजयदुर्गकिल्ल्याला नवी झळाळी देण्यात येणार होती. तसेच किल्ल्याभोवतालच्या परिसराचाही विकास होणारहोता आणि मराठ्यांच्या काळात भरभराटीस आलेले विजयदुर्ग बंदर, बंदरासमोरीलकाहीसा दुर्लक्षित ‘ आंग्रे रॉक ‘ यांचाही कायापालटहोणार होता. मात्र पर्यटन महामंडळाचे घोडे कुठे अडते ते समजत नाही.
              जुलै २००८मध्ये एका मध्यरात्री किल्ल्याच्या तटबंदीचा काही भाग कोसळला.पायवाटेलाही तडे जाऊन समुद्राच्या बाजूची तटबंदी कोसळण्याची शक्यता निर्माणझाली आणि या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्वच धोक्यात आले.ही बाब संबंधितांच्या नजरेस आणून देताच, किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी भारतीय पुरातत्व विभागाने तीन कोटी रुपयांचानिधी मंजूर केला असल्याचे तसेच दिल्लीतूनहा निधी लवकरच मंजूर होईल आणि पावसाळ्यानंतर डागडुजीच्या कामाला सुरुवात होईल असे संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काहीच घडले नाही. कोकणच्या किनारपट्टीवर जांभा दगडाचा वापर करून उभारलेला हा विजयदुर्ग किल्ला म्हणजे बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. सध्या हा किल्ला झाडा-झुडपांनी व्यापलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर जंगली वनस्पती वाढलेली आहे. तर, तटबंदीच्या चिरांमध्ये वडाच्या झाडांची वाढ झाल्यामुळे तटबंदी ढासळण्याच्या बेतात आहे. या ढासळत चाललेल्या तटबंदीचीप्रथमतः दुरुस्ती करून नंतरच महत्त्वाच्या वास्तूंचे नूतनीकरण करण्यास पुरातत्त्वखात्याने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते. किल्ल्याची तटबंदी पाहता ढासळलेल्या दर्या बुरुजाची दुरुस्ती करणे, येथीलविहिरीची स्वच्छता करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. नगरखाना, मुख्य दरवाजा यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असूनत्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

             महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांना आहे. गड-किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास, कथा-कादंबऱ्यापेक्षा प्रत्यक्षस्थळ दर्शनाने इत्थंभूत उभा राहतो. ‘ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता’ ही धारणा दस्तुरखुद्य छत्रपती शिवरायांची होती. या दृष्टिकोनातून महाराजांनी महाराष्ट्राच्या पाश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले, त्यामध्ये मुरुडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे. मात्र, इतिहासाची साक्ष देणाºया या किल्ल्याची दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष होत असून, शिवभक्त, पर्यटक आणि स्थानिक नाराजी व्यक्त करत आहेत. ऐतिहासिक दस्तावेजानुसार इ.स. १६७८ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाच्या बांधकामास सुरुवात केली तर बांधकामाची समाप्ती राजे संभाजींनी केली, असा उल्लेख आढळतो. सिद्दीच्या ताब्यात असलेला जंजिरा महाराजांना १४/१५ वर्षे जंग पछाडूनही सर करता आला नाही, म्हणूनच अभेद्द आणि बेलाग अंजिक्य जंजिऱ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी पद्मदुर्गची निर्मिती अर्थात दंडा राजपुरीच्या उरावर टेहळणी होती. दर्यासारंग दौलतखान या पहाडी छातीच्या आरमार प्रमुखांवर भिस्त होती. असा ऐतिहासिक दृश्यरंजक असलेला किल्ला आज कसाबसा तग धरून आहे. किल्ल्यावर पोहोचल्यावर आपणास किल्ल्याची खरी परिस्थिती समजते. या किल्ल्याच्या भिंती पडल्या आहेत. तसेच गवत व झाडी-झुडपे बेसुमार वाढली आहेत. या किल्ल्यात गोड्या पाण्याचा एक तलाव आहे; परंतु ते आटले आहेत. या तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष के ल्याचे येथील परिस्थितीवरून दिसून येते.
       समुद्राच्या जवळ असणाऱ्या किल्ल्याच्या भिंती तुटून पडल्या आहेत; परंतु दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. बहुतांशी भिंतींना चिरा व भेगा पडल्या असून याची वेळेत दुरुस्ती झाली तर या किल्ल्याचे अस्तित्व चिरकालाचे राहणार आहे; परंतु पुरातत्त्व खात्याकडून गेल्या अनेक वर्षांत कोणतेही पैसे खर्च न करण्यात आल्याने किल्ल्याची अवस्था चिंताजनक झाली आहे.या किल्ल्यात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे येथे तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे. कारण मशिनच्या बोटीने पोहोचल्यावर साध्या बोटींमधून या किल्ल्याच्या किनाºयावर पोहोचता येते. जर बोट उपलब्ध न झाल्यास कंबरेपेक्षा वर पाण्यातून किल्ला गाठावा लागतो, यासाठी या किल्ल्यावर तरंगती जेट्टी उपलब्ध झाल्यास किल्ल्यात जाणे-येणे सहज सोपे होऊन पर्यटक व स्थानिक नागरिकांची रेलचेल वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे पुरातत्त्व खात्याने दुर्लक्ष केली.

            किल्ल्यात जास्त वर्दळ नसल्याने येथील तोफा चोरून नेण्याचा प्रताप समोर आला आहे. दीड वर्षापूर्वी या किल्ल्यात असणारी तोफ चोरून नेण्यात आली होती. याबातची रीतसर तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुरातत्त्व खात्याचा कोणताही व्यक्ती किल्ल्यात हजर नसल्याने या किल्ल्यातील देखभालीकडे पुरातत्त्व खात्याचे मोठे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जंजिरा किल्ल्यावर पुरातत्त्व खात्याने एक विशेष व्यक्ती तैनात केली आहे; परंतु पद्मदुर्ग किल्ल्यात कोणीही व्यक्ती हजर नसते.रायगड किल्ल्यासाठी २० कोटी रुपये शासनाचा निधी मिळतो; परंतु जलदुर्ग किल्ल्यासाठी कोणताही निधी न मिळाल्यामुळे हे किल्ले विकासापासून दूर आहेत. प्राचीन वस्तूचे महात्म्य टिकवणे हे पुरातत्त्व खात्याचे काम असतानासुद्धा ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे किल्ल्यावरील अवस्था पाहून लक्षात येते. जंजिरा किल्ल्याप्रमाणे आम्हाला पद्मदुर्ग किल्ला पाहण्यास आवडेल; परंतु येथे जाण्या-येण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. या ठिकाणी तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे, जर येथे सुविधा प्राप्त झाली तर आमच्यासारखे पर्यटक या किल्ल्यावरही जाण्यास उत्सुक आहेत.
        शिवनेरी किल्ल्याचे सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. तेथे तरुण मुले मुली जाऊन आपली नावे कोरतात. काहीतरी लिहितात. केवळ शिवनेरीच नाही, तर औरंगाबादच्या अजिंठा-वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा, आग्र्याचा ताजमहाल अशा पाहिलेल्या अनेक ठिकाणी हाच प्रकार घडतो. जर कोणी लहान मुले असे करत असतील तर आपण ओरडू तरी शकतो पण तरुण-तरुणी, मोठीमोठी माणसेच अशी वागू लागली तर येणाऱ्‍या पिढीला आपण या‌‍ शौर्यवीराच्या कथा सांगणार की त्यावर केलेली रंगरंगोटी दाखविणार? सहज सुट्टीच्या वेळी लोक बाहेर फिरण्यासाठी जेव्हा गड-किल्‍ल्यांवर जातात, आणि कोणी विचारलं की काय बघितलं तिकडे तर अनेक लोक काही नाही, सगळं पडलं आहे. बघण्यासारखं काहीही नाही अशी निराशाजनक उत्तरे देतात. तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते की, भले ही आज आमचे किल्ले थोडे ढासळले असतील पण महाराष्ट्राची शान म्हणून ताठ मानेने उभ्या असणारा तोरणा, सिंधूदुर्ग, रायगड, सिंहगड, शिवनेरी अशा अनेक किल्यांचा आपल्याला अभिमान हवाच. शेकडो किल्यांचा हा खजिना आपला आहे, त्याला जपण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे.
                आपण फक्त किल्ल्यावर मंदिरावर मोठमोठ्या वास्तूवर लावलेल्या त्या नोटिसा वाचण्याचा कंटाळा येऊन त्यांचे फोटो काढतो. मात्र आपणच आपल्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्याचा अपमान करतो आणि स्वत:च्या देशाची प्रतिमा मलीन करतो. त्याचा कधी विचार केला आहे ? आपण या स्थळावर भेट देण्यासाठी जातो. इतिहासातील या वास्तू उत्तम शिल्पकाराची, चित्रकाराची ओळख करून देतात. वर्षानुवर्षे ऊन-पाऊस सोसणाऱ्या या किल्ल्यांना काही होत नसून उत्कृष्ट बांधकामाची पोच पावती आपल्याला या वास्तू देतात. पण या ठिकाणी जाऊन लोक त्यांच्या प्रेमाची आठवण प्रियकर प्रेयसीची नावे मोबाईल क्रमांक देऊन काय साध्य करण्याच्या विचारात असतात हे मला काही समजत नाही?
  सध्या सगळीकडे स्वच्छता अभियानाचे वारे सुरु आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लहान मोठे कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता अभियान राबवून आपआपला परिसर स्वच्छ करण्याच्या मागे आहेत. माझ्या या लेखातून मला हेच पोहचवायचे आहे की, आपण वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो. मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकताच मराठी माणूस मान उंचावतो. मग ऐतिहासिक वास्तूचा खजिना आपल्याजवळ असताना यावर फालतू विनोद, मजकूर लिहून का आपण आपली शोभा करून घेतो? यानंतर तरी असे काही होणार नाही याची शपथ घेऊन येणाऱ्या पिढीला आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख करून देण्याची जबाबदारी आपणच घेऊ या.

आपला सांस्कृतिक वारसा आपणच जपायला हवा आणि या करता तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहाजहान ने मुमताजसाठी ताजमहाल सारखी भव्य वास्तू बांधून त्यांचे प्रेम व्यक्त केले. आपण याचे कौतुक करू, हवा तर फोटोही काढू मात्र इतिहासातील खरेखुरे साक्षीदार बनून त्यावर स्वत:च्या प्रेमाची कबुली देण्याची गरज अजिबात नाही. या कोरीव कामाने आपण स्वत:ला बदनाम करून घेतोय याचा विचार जरूर करा. आपले किल्ले ऐतिहासिक वास्तू ही आपली शान आहे. विदेशी पर्यटक या वास्तुचे कौतुक करतात. स्थापत्य कलांचे उत्तम उदाहरण देणाऱ्या या वास्तुची देखभाल आपल्यालाच करायला हवी ना ! आपणच आपल्या अभिमानास्पद ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला हवे ना ! तर चला. आपली ऐतिहासिक पर्यटनस्थळे स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राहतील, अशी शपथ घेऊया.

महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास पुस्तकामध्येच दिसून येतो.आपल्या राजाचा बहुतांश  इतिहास आज आपल्या डोळ्यासमोर उभा आहे .तो इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत.गरज आहे त्यांच्या हाताला हात लावायची.कारण नव्या पिढीसाठी फक्त स्वाभिमान ,अभिमान याच गोष्टी नाही ठेवायच्या .त्या काय पुस्तकात पण राहू शकतात.परंतु बांधकाम शास्त्राचे उत्कृष्ट नमुना असणारे किल्ले,शत्रूसाठी उभारलेल्या चकव्या वाटा,पाणी डोंगर अशा अवघड ठिकाणी बांधलेल्या किल्ल्यांतून छत्रपती शिवरायांची दिसणारी दूरदृष्टी , मावळ्यांची ताकत,राज्यकारभाराची किल्ल्यावर केलेली व्यवस्था या सर्व गोष्टी नवीन पिढीनी याची देही याचे डोळा पहाव्यात यासाठी गडकिल्ले संवर्धनचा अट्टाहास आहे. 
महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती आपल्या भूगोलाची आणि पुरातन वास्तू या इतिहासाच्या ठेवी आहेत. या वास्तूंचे जतन हे आपण नाही केले तर दुसरं कोण करणार? अनेक व्यक्ती, गट यासाठी आज झटत आहेत पणे त्यांचे प्रयत्न आज एकाकी पडताना दिसतात. महाराष्ट्र म्हणून आपण या गोष्टीला पुरेसे महत्व दिलेले नाही. या प्रयत्नांना लागेल ती मदत करणं हे आपलं कर्तव्य आपण मानायला हवं.
                असे अनेक हौशी गट आहेत ज्यांना गड संवर्धनाबद्दल आस्था आहे. ते नियमितपणे गड चढतात. त्या गडाचा इतिहास जाणून घेतात. त्यांच्यासारख्या इतर दुर्ग-प्रेमींना तिथल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती सांगतात. काही संस्था आहेत ज्या शाळा-महाविद्यालयाच्या मुलांना इतिहास अभ्यासासाठी गडावर नेतात. त्या काळातल्या गोष्टी सांगून, तसे वातावरण निर्माण करून इतिहास जिवंत करून सांगतात. पण हे प्रयत्न त्यांच्यापुरतेच मर्यादित राहतात. या दुर्ग-प्रेमींसाठी बर्‍याच गडांवर पुरेशी व्यवस्थाच नसते. सरकारकडून त्यांना पुरेसं सहकार्य किंवा आर्थिक सहाय्य मिळत नाही. अशा गटांची दखल सुद्धा घेतली जात नाही.


           गड-किल्ले अनेक वर्षांपासून अंधारात आहेत. ज्यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांचीच आज दुरवस्था झाली आहे.या दुर्लक्षित दुर्गसंपत्तीकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे. आपल्या गड आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्या वारशाचे जतन हे आपणच करायला हवे असा विचार आता लोकांच्या मनामध्ये रुजतो आहे, तो बळावला पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास समजून पुढे जाण्यासाठी आता ही जागरूकता लोकांमध्ये हळूहळू वाढत चालली आहे, ती अधिक वेगाने पसरली पाहिजे.

Gangadhar DHAVALE
Gangadhar DHAVALE


गंगाधर ढवळे,नांदेड

 संपादकीय\

१२.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *