बौद्धिक क्षमता विकसित करणारं प्रशिक्षण संपन्न

 

मुखेड: सर्व प्रथम संस्कृती मंत्रालय भारत सरकार , तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य,अंतर्गत ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई . राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता आयोजित करण्यात आलेल्या वेंकटेश्वरा विश्वविद्यालय तिरुपती , या अंतर्गत असणारा ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

श्री अशोक गाडेकर साहेब,( ग्रंथालय संचालक , मुंबई) श्री.सुनिलजी हुसे सर , ( सहाय्यक ग्रंथालय संचालक, छत्रपती संभाजी नगर ) श्री . अनिल बाविस्कर सर (अधिक्षक सहाय्यक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजी नगर ,) श्री अ.वा.सुर्यवंशी साहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय (नांदेड), श्री कैलाशचंद्रजी गायकवाड साहेब, तांत्रिक सहाय्यक (नांदेड) या यांच्यासह इतरांचेही योगदान महत्त्वाचे होते.

प्रेरणा… प्रोत्साहन… प्रवृत्त…हा त्रिगुणात्मक योग जुळून आणण्यात वरील सर्व सन्माननीय व्यक्तिचा सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच ज्या त्या वाचनालयाच्या पदाधिकारी यांनी अध्यक्ष ,सचिव, सहसचिव, यांनी हे गांभीर्याने घेत आपला कर्मचारी सहभागी झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून कार्यरत राहण्यासाठी परवानगी देखील तेवढीच महत्त्वाची.
प्रशिक्षण कशासाठी ? तर भविष्यात सार्वजनिक ग्रंथालयाला आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी हे प्रशिक्षण.. योग्य दिशा… परिवर्तन… समृद्ध ज्ञानकक्षा रुंदावत आपण आपल्या वाचकाप्रती सेवावृत्ती जपली जावी यासाठी हे प्रशिक्षण.

महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील महत्वाच्या घटकांसाठी होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला मरगळलेल्या स्थितीत बळ देणारी ही उर्जा उपयुक्त ठरेल. सार्वजनिक चळवळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असताना प्रगल्भ विचार…आत्मनिर्भता…समाज घडविणारे दूत बना .या संकल्पनेचा मागोवा घेत बळकटीकरण करणे हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे . कर्मचारी हा परिपूर्ण बौद्धिक क्षमतेवर घडावा हिच शिकवण महत्त्वाची असल्याचं या प्रशिक्षणातुन निष्पन्न झाल्याचं पाहायला मिळालं.

‌ एकच बाब अधोरेखित करणारी होती ती म्हणजे वेतनश्रेणी..सेवा नियम …आंध्रा… तेलंगणा… तामिळनाडू…या राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयात कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन व सेवा नियम आहेत. आम्ही जेंव्हा आमच्या व्यथा मांडल्या तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ममत्व… आपलेपणातुन डोळ्यात आलेले अश्रू मौल्यवान होते. खरंच खूप खूप अपमानास्पद वाटलं कुठे हि विचार धारा कुठे आपला कर्मदरिद्री विचार सरणीचं सरकार . महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला चांगले दिवस येतील हे अंधकारमय आहे

आपलं कर्तव्य आपली तत्वं म्हणून मी या प्रशिक्षणाचा भरपूर आनंद आणि सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रातील शिवाजी हंबीरे (नांदेड) महादेव आगजाळ, ( सेलू )सतिश टाकळकर ( पुर्णा ) विकास चव्हाण ( लातुर ) नरेंद्र रंजितसिंह सुर्यवंशी ( अंजिठा, छत्रपती संभाजी नगर ) नंदकिशोर सिताराम (सिल्लोड ,) सुयोग जोशी ( धाराशिव ) रमाकांत शेरकर ( बीड ) वसंत गोविंद जंजाळ (भोकरदन जालना ) आधी सह अनेकांचा सहभाग होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *