माणसात रमणारा माणूस : एन डी राठोड

 

 

 

तसा माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. समाजशास्त्रातील हे तत्व सर्वच माणसाला कमी अधिक प्रमाणात लागू पडते. यात काही शंका नाही.
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे अध्यक्ष श्री एन डी राठोड यांचा जन्म दिवस ,( ०४ एप्रिल ) आहे.प्रथमतः सरांना वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा…!!
एन डी राठोड सर माणसात रमणारे माणूस आहेत. एवढे मात्र खरे आहे. अगदी अलिकडे घडलेला एक प्रसंग असा आहे की,आम्ही रविवार दि १७ मार्च २४ रोजी नियोजित साखरपुडा आटोपला. आणि घरी वापस येण्यासाठी न निघता, पुरजळहून जवळा बाजार येथे गेलो. तेथे सरांचे शालेय मित्र कोंडिबा रोकडे राहतात. कारण काय आहे तर गतवर्षी मे महिन्यात सरांच्या मुलाचे (अमोल) लग्न झाले. सरनी त्या लग्नाचे रोकडे काकांना मुळ पत्रिका दिली होती. पण काही अडचण आल्यामुळं रोकडे काका लग्नाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे सरनी गतवर्षीच्या लग्नाची साडी, ब्लाऊज पीस आणि दस्ती टोपी घरपोच नेऊन दिली.आणि सहज आठवण म्हणून सोबत असणारा ‘ महाराष्ट्र माझा ‘ हा कवी विजय पवार यांचा काव्यसंग्रह भेट देऊन फोटो काढून घेतला.
मला वाटलं हे थोडे हास्यास्पद झाले आहे. लगेच वाटलं हा काय प्रकार आहे, सासू गेली पावसाळ्यात आणि रडू आलं उन्हाळ्यात. वरवर पाहता हे खरं आहे. पण आणखी थोडा विचार केला तर सरांचे बरोबर होते.कारण त्यानिमित्ताने मित्राची भेट झाली. आणि दोघेही गप्पांच्या ओघात काही वेळ बालपणात रमून गेले.
आणखी एक गोष्ट म्हणजे सौ रोकडे काकू घरी नव्हत्या. तर आम्ही सर्व जण घरी आल्यावर त्यांनी खुर्च्या टाकल्या. कदाचित आम्ही सर्व जण घरी येणार आहोत ही कल्पना त्यांनी पोरांना दिली नसेल. तर दुसरीकडे जेष्ठ नागरिकाकडे कुणी आले तर तरुण मंडळी त्यांची व्यवस्थित दखल घेतील, मदत करतील, असे काही राहिले नाही. असेही मला वाटून गेलं.
पण देर मगर दुरुस्त या प्रमाणे त्यांनी मुळ घरपोच केले आणि परत एकदा बालपण जगले, माणसात रमले. परत एकदा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!! (अजिंठ्याच्या डोंगरावरून. व्यक्ती परिचय .)

पार्वतीपुत्र प्रा भगवान कि आमलापुरे.
फुलवळ ता कंधार.
संपर्क : ९६८९०३१३२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *