रंगभरण चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदेड- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील देगाव चाळ परिसरातील प्रज्ञा करुणा विहार येथे रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिशेष पँंथर सूर्यकांत ढवळे यांच्या स्मरणार्थ पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी येथील सुप्रसिध्द विचारवंत बालाजी थोटवे, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, कवी पांडुरंग कोकुलवार, आदर्श शिक्षिका पंचफुला वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते तथा संयोजक सुभाष लोखंडे, समाजसेवक सिद्धार्थ काशिराम हटकर, लक्ष्मण पावडे, दिगांबर हनमंते, राहुल गायकवाड, चंद्रभान सूर्यवंशी, माणिकराव हिंगोले, रमामाता महिला मंडळाच्या आम्रपाली कदम, पारूबाई हिंगोले, अंकिता गायकवाड, सोनाबाई राजभोज, शिल्पाताई लोखंडे, लक्ष्मीबाई खाडे आदींची उपस्थिती होती. 
          येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त प्रज्ञा करुणा विहार देगाव चाळ येथे रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सर्व वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील पारितोषिके प्रथम श्रुती हटकर, द्वितीय अवनी निखाते व तृतीय आरती खिल्लारे तसेच उत्तेजनार्थ सृष्टी खिल्लारे, अनुष्का लोणे, नंदिनी हटकर यांना पँथर सूर्यकांत ढवळे यांच्या स्मरणार्थ  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
           कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प, दीप व धूपपुजन संपन्न झाले. पँथर सूर्यकांत ढवळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमापूजन संपन्न झाले. त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील, पुष्प पुजा, त्रिरत्न वंदना, भीमस्तुती, आशिर्वाद गाथा घेण्यात आल्या. त्यानंतर लक्ष्मण पावडे, पांडुरंग कोकुलवार, बालाजी थोटवे, प्रज्ञाधर ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रंगभरण चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पँथर सूर्यकांत ढवळे स्मृती पारितोषिक वितरण करण्यात आले. या विजेत्यांचा सिद्धार्थ काशिराम हटकर यांच्या वतीने ‘एक वही एक पेन’ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिक, विद्यार्थी विद्यार्थिनींना खीरदान करुन सरणत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *