Post Views: 253
20 व्या शतकात राष्ट्रनिर्माण, मानवतावाद व विश्वबंधुत्वाचा विचारप्रवाह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पुढे नेला. आदर्श गाव व आदर्श नागरिक घडवण्यासाठी त्यांनी आपल्या किर्तनांतून प्रबोधन केले. ग्रामगीतेतून राष्ट्रोन्नतीचा उज्ज्वल मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीदिनी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक : 30 एप्रिल 2024 रोजी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी,
सिद्राम रणभिरकर, साजिद हासमी, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, राजेश मेथेवाड, जोगिंदर भुक्तरे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.