कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व गाव बैठकांचे 20 मे ते 31 मे दरम्यान आयोजन  ; तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते  यांची माहिती

 

 

कंधार : तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्रत्येक गावामध्ये दिनांक 20 मे ते 31 मे पर्यंत गाव निहाय खरीप हंगाम पूर्व गाव बैठकांचं नियोजन करण्यात आले आहे अशी माहीती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते यांनी दिली.

खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे त्या पार्श्वभूमीवरतालुक्यातील शेतकरी खरीप हंगाम पूर्व कामे करण्यात व्यस्त आहे. याच दरम्यान शेतकरी व कर्मचारी अधिकारी यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी गाव बैठकांचे आयोजन करण्यात आलेला आहे .
या गाव बैठकीमध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकाविषयी माहिती तसेच
१ .बियाणे उगवन क्षमता तपासणी करणे
२ .बीज प्रक्रिया करून बियाण्याची पेरणी करणे याविषयी महत्त्व पटवून सांगणे
३..खरीप हंगाम 2024 मध्ये रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करूनच पेरणी करणे.
४ . निंबोळी अर्क तयार करण्यासाठी निंबोळ्या गोळा करणे
५ .माती परीक्षण करण्यासाठी जमिनीचा नमुना कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन .
६ .जमीन आरोग्य याविषयी माहिती
७.जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी गांडूळ खत कंपोस्ट खत इत्यादी खतांचे तयार करण्याच्या पद्धती व त्यांचे महत्त्व पटवून सांगणे
८ . पाणीटंचाईच्या काळामध्ये फळबागांचे जतन करणे याविषयी जनजागृती
९ .ऐत्या खरीप हंगामामध्ये फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज गोळा करणे
१० .मूलस्थानी मृद व जलसंधारणाबद्दल माहिती .
११. तसेच खरीप हंगाम 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध पिकांच्या महत्त्वाच्या वाणांबद्दल माहिती देणे .
12. बियाणे खते कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी
13. खरीप हंगाम 2023 मध्ये हुमणी व शंखी गोगलगाय नियंत्रण याविषयी मार्गदर्शन .
14. इत्यादी विषयांची चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे . तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांच्या संपर्कात राहून वरील बैठकांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री विठ्ठल गीते यांच्या तर्फे करण्यात येत आहे .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *