भीमाशंकर विद्यालयाने निकालात राखली यशाची परंपरा कायम…! उच्चांकी निकालासह मिळवले दैदिप्यमान यश

कंधार/ता.प्र.

कंधार तालुक्यातील शिराढोण येथील भीमाशंकर मा.व उच्य माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत उच्चांकी निकालाला गवसणी घातली असून विज्ञान शाखा ९९.१५% वाणिज्य शाखा ९२.३०% तर कला शाखेचा निकाल ९४.४० % लागलेला असून या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य मा. व उच्च मा. शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत लोकनेते कै. माधवराव गोविंदराव पा. पांडागळे यांच्या दूरदृष्टीकोनातून नावारूपास आलेल्या ग्रामीण भागातील या विद्यालयाने उच्चांकी यश मिळवले आहे. विज्ञान शाखेत सुक्रे प्रणव परमेश्वर ८८.३३% गुण घेऊन प्रथम आला असून अंबेकर स्नेहा  ८७.६७% गुण घेऊन व्दितीय आली आहे तर सायली रामदास पांडागळे, पांडागळे प्रणिता व्यंकटराव, कापळे योगेश सुनील, मदेवाड सुयश बालाजी, माने ऋषीकेश केशव यांच्या  सह विध्यालयातील ३१ विध्यार्थांनी ८०% च्या वर टक्केवारी घेऊन विशेष श्रेणी प्राप्त केली आहे.विज्ञान शाखेतील तब्बल २१३ विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

 

कला शाखेत लोंढे कांचन गणेश व वैद्य अरती संतोष ह्या दोघी ७७.५०% गुण घेऊन प्रथम तर जमदाडे निशांत विनोद  ७३.६७% गुण घेऊन व्दितीय आला असून ३८ विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत देशमुख रत्नेश्वरी ६७.१७% गुण घेऊन प्रथम आली असून अमृते मानसी  ६१.१७% गुण घेऊन व्दितीय आली आहे. बारावी परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विध्यार्थांचे व त्यांच्या पालकांचे भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जयराम पा. पांडागळे, महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक तथा भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सदस्य डॉ. गोविंद नांदेडे, कंधार कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य व भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सचिव बालाजी पा. पांडागळे तसेच उपाध्यक्ष माधवराव पा. कपाळे, कोषाध्यक्ष गणपतराव देवणे सदस्य शंकर पा. पांडागळे, गोविंद पा. कपाळे तसेच प्राचार्य खुशाल पा. पांडागळे पर्यवेक्षक रामदास पा.पांडागळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विध्यार्थांचे अभिनंदनासह कौतुक केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *