नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालय येथे 6 वर्ष पूर्ण झालेले 41 व 3 वर्ष सेवा पूर्ण झालेले 6 असे 47 महसूल सहाय्यक एकाच ठिकाणी तर 6 वर्ष सेवा पूर्ण झालेले 28 व 3 वर्ष सेवा पूर्ण झालेले 6 अव्वल कारकून असे एकूण 34 अवल कारकून एकाच शाखेत एकाच कार्यालयात कार्यरत आहेत.विशेष बाब म्हणजे यातील अनेकजनाची 10 ते 18 वर्ष सेवा येथेच पूर्ण झाली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील 8 उपविभागीय अधिकारी कार्यालय व 16 तहसील कार्यालय येथे 6 वर्ष व 3 वर्ष नियमाप्रमाणे सेवा झालेले व बदली पात्र असणारे महसूल सहाय्यक यांची संख्या 126 असून बदली पात्र अव्वल कारकून यांची संख्या 66 आहे.नियम प्रमाणे 192 कर्मचारी हे आज रोजी बदली पात्र आहेत,अशी सूची जिल्हाधिकारी कार्यालयाने दि 6 मे रोजी, संबंधित विभाग प्रमुखांना प्रसिद्ध करण्या साठी सांगितले आहे.
रिपब्लिकन बहुजन सेने चे प्रदेश अध्यक्ष राजरत्न गायकवाड यानि अप्पर जिल्हाधिकारी नांदेड याना भेठुन दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महसूल विभागात एकाच ठिकाणी, एकाच खुर्ची ला चिटकून बसलेले महसूल साह्यक व अव्वल कारकून यांच्यात व प्रत्येक वेळी बदली पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यां पेक्षा विशेष असे कोणते कौशल्य आहे की ते एकाच ठिकाणी 10 ते 18 वर्षा पासून आहेत व त्यांची बदली होत नाही की
संबंधित विभागाने हे बदली पात्र कर्मचारी यांचा सेवा तपशील जाणूनबुजून या पूर्वी जिल्हाधिकारी यांच्या समोर ठेवला नाही.हा विषय फार मनोरंजक आहे.
परंतु दि 20 मे रोजी स्थानिक वृत्तपत्रात महसूल विभागाच्या बदली प्रकरणाची बातमी आली व ती चर्चा जिल्हाभर कर्मचारी यांच्या सह जनतेत होऊ लागली.
रिपब्लिकन बहुजन सेने च्या वतीने असे ही नमूद करण्यात आले की बदली पात्र अनेक महसूल सहयक व अव्वल कारकून हे बदली झाले तरी या वेळी ही निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या काही करामती अधिकारी व कर्मचारी यांचे पाठबळ मिळवून, हवी ती वसिलिबाजी लावून पुन्हा त्याच ठिकाणी प्रतिनियुक्तीवर येण्याच्या तयारीत आहेत. या कडे ही जिल्हाधिकारी कार्यालयाने सूक्ष्म निरीक्षण करवे.असे ही म्हंटले आहे.
बदली पात्र सर्वांच्या बदल्या नियमाने करून,10 ते 18 वर्ष एकाच ठिकाणी आपले बस्तान मांडून शबिना मिरवणारे कर्तबगार यांच्या कर्तबगारीची मिरास मोडून निघेल की पुन्हा तीच जागा आणि तोच कर्मचारी हेच जिल्ह्यातील जनता पाहणार का ?असे रिपब्लिकन बहुजन सेनेस वाटते.
अनेक महत्वपूर्ण विभागात सेवा करणारे , महसूल विभागात आपणच ग्रेट समजणारे असल्यामुळे पुरवठा विभाग, गौण खनिज विभाग, भूसंपादन विभाग, महसूल विभाग, एम ए जी विभागातील कर्मचारी यांच्या मर्जी शिवाय फाईल पुढे सरकत नाही.या कार्यालयीन कार्यशैलीचा फटका सामान्य जनतेला बसताना दिसत आहे असे ही पक्षाच्या वतीने नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बस्तानबाज महसूल सहाय्यक व अव्वल कारकून यांनी वर्षानुवर्षे निर्माण केलेली मिरास तात्काळ खलास करावी. नियमाप्रमाणे सर्व बदल्या तात्काळ कराव्यात.
या निवेदनाच्या प्रति प्रत्यक्ष भेठून मा मुख्यसचिव मंत्रालय मुंबई व सचिव महसूल विभाग मंत्रालय मुंबई ,विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर याना देण्याचा मनोदय ही पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
बदली प्रकरणात कोणाला ही पाठीशी घालून, हम करे सो कायदा… ही भूमिका घेतली तर रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा विजय घाटे व महासचिव मा मुश्ताक मलिक यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालया समोर राज्यातील सर्व पदाधिकारी याना सोबत घेऊन ,लोकसभेची
आचारसहींता संपताच आंदोलन करण्यात येईल असे ही राजरत्न गायकवाड प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन बहुजन सेना याणी शासनाला इशारा दिला आहे.