विश्वसुंदरी ऐश्वर्या…आणि सौंदर्य

विश्वसुंदरी ऐश्वर्या…आणि सौंदर्य
तिची मेहनत , हुशारी , विश्वसुंदरी बनण्याचं तिचं स्वप्न , जिद्द, आणि तिचं कर्म .. फक्त ऐश्वर्याच नाही तर अशा अनेक स्त्रीया .. नक्कीच अभिमान वाटतो… आदर वाटतो पण सौंदर्य हे फक्त बाह्य नसतं तर टॅलेंट आणि विचार म्हणजेच आंतरिक सौंदर्य , भाषा , बॉडीलॅंग्वेज.. आत्मविश्वास भाषेवरील प्रभुत्व आणि विविध कला अशा अनेक गुणानी ती व्यक्ती मानाचा मुकुट मिळवते.. पण त्यावेळी ती व्यक्ती हे का विसरते की आपण निसर्गापुढे एकदम शुल्लक आहोत.. विश्वसुंदरी असो की अब्जपती असो तो निसर्गापुढे हतबल आहे.. निसर्ग त्याचं काम करत असतो.. त्याच्यात भेदभाव नाही.. जातीभेद नाही..
आपल्याला कर्मानुसार प्रत्येकाला फळं मिळत असतात..
गेली अनेक दिवस सुजलेल्या चेहऱ्याचे ऐश्वर्याचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत आणि सो कॉल्ड फॅन्स तिला राखी सावंतसारखी दिसते असं ट्रोल करत आहेत.. याच लोकांनी एके काळी तिला डोक्यावर घेतली आणि आता तेच लोक तिची चेष्टा करत आहेत.. वाचून वाईट वाटलं आणि मनात विचार आला.. Nothing is permanent.. हेच खरय… बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की वय लपवायला तिने सर्जरी केली आणि ती फेल गेली.. सर्जरी करणाराही माणूसच आहे तो जादूगार नाही.. आणि तो आणि त्याची बुध्दी दोन्ही निसर्गापुढे हतबल आहेत.. लोकांच्या ट्रोलींगचं आपण सोडून देउ कारण टिकामटेकडे खुप आहेत आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळं मिळणारच आहेत पण अशा बुध्दीमान स्त्रीया आपलं एजींग का स्विकारत नाहीत..??.. Ageing is a beautifull process.. ऐश्वर्या हे एक उदाहरण आहे पण अशा अनेक स्त्रीयांनी सर्जरी करुन आपला चेहरा खराब करुन घेतला .. ५० शीत असताना आपण ४० चे दिसलो आणि तेही नैसर्गिक मार्गाने तर नक्कीच क्रेडीटेबल आहे पण ५० शीत असताना २५ ची दिसावी हा अट्टाहास का असावा ??.. आपल्या टॅलेंट ने आपण अनेक गोष्टी मिळवु शकतो.. सौंदर्याला लिमीटेशंस आहेत पण बुध्दीने अनेक काळ आपण या क्षेत्रात चमकु शकतो.. अशी अनेक उदाहरणे आहेत की कुठलीही सर्जरी न करता चिरतरूण दिसतात..

जितका सुंदर दिसण्याचा हक्क प्रत्येकाला आहे तितकच सुंदर मनावर आणि सुंदर विचारांवर काम केलं जात नाही याची खंत वाटते.. आपला स्वभाव हीच आपली ओळख असते..

एक किस्सा आठवला तो शेअर करते.. साधारणपणे ६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे.. मी आणि सचिन यशवंतरावला नाटक पहायला गेलो होतो. मी गेटमधुन आत जाताना कोणीतरी सीरीयलमधील अभिनेत्री आत आली.. त्याचवेळी माझ्या मागून येणाऱ्या एका लेडीने तिला विचारलं , मॅम मी एक फोटो घेउ का ?? .. तिने नाही असं सांगितले आणि त्याचवेळी मोहनकाका म्हणजे मोहनजोशी तिथे आले आणि तिला म्हणाले , तुला फोटो हवाय ना.. ये मी देतो .. मोहनकाका ज्येष्ठ नट आणि ती कुठेतरी एका सीरीयल मधे काम केलेली कोणीतरी अभिनेत्री… पण गर्व पहा किती.. खरं तर प्रेक्षकांमुळे नट मोठा होतो.. आणि तेच नंतर भाव खातात.. तिथे तिने नम्र असायला हवं होतं आणि हेच तिचं सौंदर्य होतं पण ते ती विसरली..
सौंदर्य मिळवण्याच्या नादात प्रचंड पैसा खर्च करायला लागतो.. तो अनेक कलाकारांना परवडत नाही त्यामुळे वाममार्गाने पैसा मिळवला जातो.. एकदा चटक लागली की त्या चक्रात माणूस अडकत जातो आणि आपलं अस्तित्व विसरुन जातो.. सौंदर्य शाप कि वरदान हा प्रश्न मला कायम पडतो.. जे जे बदलत जाईल ते ते आपल्याला स्वीकारता यायलाच हवं.. माझ्या वाचकांना पुन्हा एकदा सांगते .. सोशल मिडीयावर कोणालाही ट्रोल करुन पापाचे भागीदार होवु नका.. आपणही त्या वयात जाणार आहोत.. या नैसर्गिक चक्रातुन कोणाचीही सुटका नाही.
Be natural..Be healthy
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *