कंधार ; पाताळगंगा नगरीचे माजी पोलीस पाटील नामदेवराव शाहुजी वाघमारे यांचे आज दि.१२ रोजी निधन झाले असून अंत्यविधी उद्या १३/६/२४ सकाळी ११ वाजता पाताळगंगा तालुका कंधार येथे होणार आहे.
पाताळगंगा नगरीचे माजी पोलीस पाटील कै.नामदेवराव शाहजी वाघमारे यांनी आपल्या पदावर राहुन गावातील अनेक गोरगरीब जणतेचे निस्वार्थ काम केले.
वेळप्रसंगी प्रसंग अवधान साधून त्यांनी दोन्ही समाजाचा समतोल ठेवुन आपल्या पदाचा कधीच दुर उपयोग न करता दोन्ही समाजाला समजुन सांगत गावकऱ्यांनी सामंजस्याची भुमीका घेण्याचे काम यांनी केल.
तब्बल अंदाजे 20/25 वर्षे पोलिस पाटील पदावर कार्यरत होते पण गावातील झेगडे कशाही प्रकारचे आसो ते गावातच मिटविण्याचा प्रयत्नच केला नसुन तर गावातच मिटवीले आणी पोलिस स्टेशन मधे जाण्याचे टाळले.ऐवढेच नसुन गावामधे गणपती असो किंवा पोळा असो या कुठलाही सार्वजनिक प्रशासनाच्या समंधीत कार्यक्रम असो यांनी विशेष म्हणजे बिना पोलीस प्रोटेक्शन चे कार्यक्रम पार पाडले आणी आज पर्यंत तेच समोर चालत आहे…आणी त्यांच्या या धडाडीच्या कार्याने पोलीस स्टेशन मधे पाताळगंगा गावचे रेकॉर्ड नंबर वन वर आहे.
मध्यंतरी काही काळ त्यांच्या कडे स्वस्त धान्य दुकान होते त्या मधे सुद्धा त्यांनी आपली भुमिका ऐकदम प्रखड पार पाडली आणी बर्याच लोकांना अंतोदया खाली आणुन गोरगरिबांना 35 किलो राशन मिळवून दिले.बाहेर गावी आसलेले आपल्या गावातील कुटुंबाना पण मदत करुन राशन मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.पोलीस प्रशासन आसो की तहसील प्रशासन आसो किंवा पंचायत समिती प्रशासन आसो त्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनशी अति जिव्हाळ्याचे समंध ठेवुन गावातील गोरगरिब जणतेचे काम त्यांनी केले ..
आसे अनेक गावहितात त्यांनी कार्य केले यांच्या कार्याबद्दल जेवढे लिहीवावे तेवढे कमीच आणी निःशब्द च म्हणावे लागेल.आशा या कार्याला गावकरी कधीच विसरू शकणार नाहीत आपले कार्य कायम स्मरणात राहतील…
ग्रामपंचायत च्या वतीने तथा गावकऱ्यांनच्या वतीने अती जड अंतःकरणाने आपणास भावपूर्ण श्रद्धांजली … आपल्या आत्म्यास शांती लाभो आणी वाघमारे परिवारावर कोसळलेल्या संकटातुन बाहेर पडण्याची परिवाराला शक्ती देवो अशी ईश्वर ला प्रार्थना करतो…
बालाजी चुकलवाड ,
माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष