रविवारची सकाळ होती तरीही मी रोजच्या वेळेत म्हणजे ६ वाजता टेकडीवर होते..उन्हाळ्यात संपूर्ण खाणी कोरड्या झाल्या होत्या त्यात आता बऱ्यापैकी पाणी साचलय पाहून आनंद झाला.. मासे , बदक , पाणसाप , कमळं यांची सोय भगवंताने केली होती… सकाळी निसर्गात जाणं हा सुखद आणि आल्हाददायक अनुभव असतो.. वर गेल्यावर स्ट्रेचिंग बेंडींग केल्यावर अजूनच हुरूप येतो.. सगळीकडे टाकळा रुजायला सुरुवात झाली आहे.. तीन पानाच्या टाकळ्याची भाजी खूपच पौष्टिक असते.. पिवळ्या कण्हेर चा सुगंध सगळीकडे पसरला होता तो नाकात भरुन मी घरी आले..
घरी आल्यावर ब्रेकफास्टला काय करुयात असा विचार करत किचनमधे गेले तर बाथरुममधुन सचिनची हाक आली , सोनल टॉवेल दे ना.. लगेच अशेक सराफ , रंजना यांची फिल्म आठवली.. तो कसा तिला बाथरुम मधे ओढतो आणि त्याचवेळी कुलदिप पवार आणि रंजना यांची फिल्म आठवली.. ती रेडीओवर गाणं ऐकत आंघोळ करत असते .. एका सेकंदात सगळं दृश्य समोर आलं आणि तितक्यात परत सचिनने आवाज दिला .. अगं देतेस ना.. मी लगेच म्हटलं , काय रे तु . तु टॉवेल कसा विसरलास ??.. असं म्हणुन टॉवेल त्याच्या हातात दिला आणि माझच मला हसू आलं .. अरे यार हे सगळं फिल्म मधे असतं किवा दुसऱ्या वेगळ्या पार्टनर सोबत घडु शकतं.. नवरा बायकोत केवळ अशक्य आणि तेही लग्नाला इतकी वर्षे झाल्यावर ??.. फिल्म मधे किवा सीरीयल मधे पाहिल्यावर आपण रोमॅन्टिक होतो .. अगदी आपल्याही आयुष्यात हे सगळं व्हावं वाटतं पण ती व्यक्ती वेगळी हवी किवा तो स्पर्श वेगळा हवा हेही प्रत्येकाला वाटतं पण सगळेजण व्यक्त होत नाहीत किवा भावना दाबुन जगतात..
तो आंघोळ करुन बाहेर आल्यावर त्याच्या हातात गरमागरम खिचडी दिली आणि म्हटलं, काय रे मघाशी टॉवेल देताना माझा हात का नाही धरलास ??.. त्यावर तो म्हणाला , का गं खिचडी करताना भाजलं का ??.. देवा … काय करु या नवरोबाचं.. लग्नाला अनेक वर्षे झाली की रोमान्स जातो आणि तिथे काळजी येते .. यालाच प्रेम म्हणतात बहुधा..
मी वेगळ्या अर्थाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर वेगळं मिळालं आणि घरोघरी त्याच परी या म्हणीचा अर्थही गवसला.. आयुष्यात तीच व्यक्ती किवा तोचतोचपणा आला कि , आयुष्य बेचव होतं.. रोमॅंसला वय नसतं पण व्यक्ती बदल हा आयुष्यात नव्याने रोमान्स आणु शकतो हेही तितकच खरय.. कुठलीही गोष्ट वाटणं आणि ती करणं ह्या दोन्ही क्रिया टोटली वेगळ्या आहेत.. कारण जेव्हा कृती होते तिथे नाती बदलतात.. पाप पुण्य , व्यभिचार तिथून सुरु होतं.. पण वेगळा विचार करुन त्याच व्यक्तीला नव्या रुपात पाहून जेव्हा नात्यात मिश्किलता येते तेव्हा तेच नातं नव्याने उलगडतं..
नवरा बायको पूर्णता मित्र होवु शकत नाहीत त्याला लिमिटेशन्स येतात पण फ्रेंड्समधे घडलेल्या गमतीजमती जेव्हा नवराबायकोत होतात तेव्हा ते नातं खुमासदार होतं.. काल दुपारी मी लाल माठाची भाजी आणि भाकरी केली होती.. शेपू , गवार , लालमाठ या भाज्या पाहिल्या कि सचिनचा मुड बदलतो.. ताट पाहिल्यावर तो म्हणाला , माठ ही काय भाजी आहे का ??.. त्यावर मी त्याला म्हटलं , जर आपण माठ असतो तर भाजी का नाही..याला म्हणतात मुरलेला संसार आणि रुजलेलं प्रेम.. नवऱ्याला जे आवडत नाही ते त्याच्या गळी उतरवुन त्याला टॉवेलात गुंडाळून , गुळ लावून आपल्याला हवं ते साध्य करता येवु शकतं.. मग बाथरुममद्गे रोमॅंस करायची काय गरज ना ..??
आमच्या घरात या अशा अनेक गमतीजमती घडत असतात म्हणुन मी जे लिहीते ते तुम्हाला आपलसं वाटतं.. प्रत्येकाने लेख मन लावून वाचा कारण मला जे सांगायचे आहे ते सोडून वेगळा अर्थ घेउ नका.. कारण न समजून घेता प्रत्येकाला व्यक्त व्हायचे असते ..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist