लोहा ; नांदेडमध्ये जो हलगर्जीपणा झाला तसा जर लोहा विधानसभा मतदारसंघात होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आपण पराभवानंतर पुन्हा जोमाने उभे राहिलो. माझा पराभव झाला पण त्याचा मी कोणालाही दोष देणार नाही पण कोणी संपत्तीच्या जोरावर येथील निवडणूक जिकतो असे म्हणत असेल तर त्यांनी हा पैसा कसा मार्गाने मिळविला आणि तो आज पर्यंत सुरक्षित आहे याचे काळजी करा. आपण पैसा कमविला नाही पण आपल्या सारखी जीवापाड प्रेम करणारी माणसे कमावली. प्रत्येक गावात जर पंचाहत्तर टक्के मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असाल तरच आपल्या भावनांचा विचार करू असे आवाहन केले.
लोहा-कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विक्की गार्डन पारडी येथे “संवाद “बैठकीचे माजी सभापती आनंदराव पाटील व पदाधिकारी यांनी स्वतः याचे
आयोजन केले होते. यावेळी ॲड.किशोर देशमुख, कल्याण सावकार सुर्यवंशी, सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, माणिकराव मुकदम, तुकाराम वारकड गुरुजी, डॉ. सचिन पाटील उमरेकर, बालाजीराव पा. मारतळेकर, मा.सभापती मनोहर पा.तेलंग, गणेशराव पा. सावळे, बाबुराव गिरे, धोंडीराम बोडलवार, आनंदराव पा. शिंदे, किशनराव डफडे, सौ. चित्ररेखाताई गोरे, बाबू आप्पा मुक्कलवार, संजय देशमुख, मनोहर पा. भोसीकर, राम सावकार सूर्यवंशी, दत्ता वाले, छत्रपती धुतमल, सुभाष गायकवाड, जफरोदिन बहोद्दिन, लक्ष्मणराव लिंबोटे, भगवान राठोड, मिलिंद पवार, बळी पा. कदम, खुशाल पा. पांगरीकर. कालिदास गंगावारे, नरेंद्र गायकवाड, गुलाब उबाळे, जफरउला खान, केशवराव मुकदम, करीम शेख, बालाजीराव खिलारे, व्यंकट मामडे, भास्कर पवार, चंद्रमुनी मस्के, हनुमान धुळगंडे, शंकरराव ढगे, नाना तिडके, लक्ष्मणराव बोडके, बंडू पा. वडजे, डॉ. उत्तमराव सोनकांबळे, संजय पा. घोगरे, गंगाप्रसाद यन्नावार, बाबुराव केंद्रे, राजहंस शहापुरे,सुरेश बास्टे, वीरभद्र राजुरे, नागोराव पा. शिरसाट, मधुकर डांगे, अर्जुन राठोड, कोंडीबा पा. ढाले, सुभाष तोटेवाड, वैजनाथ पवार, धारबा पा. सुरनर, बाळू पा. मारतळेकर, गोविंद फाजगे, बालाजीराव तमकुटे, बाळु पा. बाबर, अविनाश पवार, मधुकर पाये, सुरेखाताई वाले, उमाकांत सोरगे, जनाताई भांड, बालाजी पवार, धनाजीराव आढाव, केरबा पा. वडवळे, संदीप देशमुख, गुरुनाथ पा. हुंबाड, संजय घोरबांड, प्रल्हाद पा. फाजगे, बालाजी तोटवाड, जयमंगलाताई औरादकर, जयश्री मामीडवार, श्रीमती रुक्मिणीबाई धोंडीबा पवार, कल्पनाताई चव्हाण, अनुसयाबाई येलरवाड, कल्पना गित्ते, वंदनाताई डुमणे, शोभाताई बगडे, वंजे ताई, काळे ताई, सुनिता घोरबांड, अनिता कदम, ज्योती धोंडगे, सुवर्णा मंगेश क्षिरसागर, जनाबाई केंद्रे, शोभा संगेवार, आशा भास्कर पवार दोन्ही तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर व पेरणीचे दिवस असतानाहीं सात-आठ हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
इतका जनसमुदाय पाहून माझ्यावर जे प्रेम आहे त्याच बळावर मी इथपर्यंत आलो. नांदेडमध्ये झालेल्या पराभवास कोणालाही दोष देणार नाहीं पण दररोज चारशे -पाचशे लोकांना भेटणारा त्यांना बोलणारा व त्याची कामे करणारा मी राज्यातला पहिला खासदार असेल. पण लोकांनी पराभूत केले कदाचित माझ्या नशिबात दुसऱ्यांदा खासदारकी नसेल.
या मतदारसंघात चार-साडे चार वर्षा पासून आम्ही काम करत आहोत असे काही जण मुलाखतीत देत सांगत आहेत पण ३०-३५ वर्षा पासून आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत तरी आम्हाला येथील जनतेची नाडी कळली नाही तर काहीजण पैशाची तिजोरी उघडून दाखवत आहेत. तुमच्याकडे पैसे आहेत पण ते सुरक्षित आहेत हेच धन्यवाद माना असा सूचक व्यक्तव्य करत नांदेड-लातूर लोकसभेत कार्यकर्ते ढिले पडले हलगर्जीपणा केला तसेच पुन्हा लोहा विधानसभेत करणार असाल जो पक्ष उमेदवारी देईल त्यांना निवडून आणू असे सांगताना उपस्थित सभागृह शांत झाले. प्रत्येक गावातून ७०-७५ टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करणार असाल तरच आपल्या भावनांचा विचार करू असे म्हणतात उपस्थितांनी दोन्ही हात उंचावून आम्ही आपल्या सोबत आहोत, आपण लोहा विधानसभा लढवावी अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. त्यावर पक्षश्रेष्ठीं जो आदेश देतील तो मान्य असेल असे संबोधित केले.
यावेळी आयोजक।माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे,
शंकरराव ढगे ,ऍड औरादकर, तिगोटे सर, माणिकराव मुकदम किरण वट्टमवार, जफरखान, हंसराज पाटील, चित्ररेखा गोरे, चंद्रमुनी मस्के, हणमंत धुळगंडे, सुभाष गायकवाड, डॉ उमरेकर यांची भाषणे झाली संचलन विक्रम कदम यांनी केले.