कंधार ( दिगांबर वाघमारे )
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंगळवारी, दि.२५ जून रोजी दुपारी २ वाजता सिध्दार्थ नगर, कंधार येथे आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित करण्यात आला आहे. या दवाखान्यांचे उद्घाटन नायब तहसिलदार गणेश मोहिजे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजू टोम्पे हे होते. उद्घाटक नायब तहसीलदार गणेश मोहिजे, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.यु.पी.बिराजदार, शेकाप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख शेरुभाई, शेकापचे तालुकाध्यक्ष अवधूत पेठकर, शेकापचे शहराध्यक्ष महेश पिनाटे, कृउबा समितीचे संचालक गिरीश मामडे, समन्वयक समितीचे सदस्य नवनाथ बनसोडे, औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास वाघमारे, जेष्ठ पत्रकार प्रल्हाद आगबोटे, पत्रकार राजेश्वर कांबळे, अॅड.रवी कांबळे, सय्यद हबिब, मयुर कांबळे , संभाजी कांबळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी नायब तहसिलदार गणेश मोहिजे यांच्या शुभहस्ते आयुष्मान आरोग्य मंदिर दवाखान्याचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आरोग्यदेवता धन्वंतरीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.यु.पी.बिराजदार यांनी करुन आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित करण्यामागची भूमिका विशद केली. या दवाखान्यातून मिळणाऱ्या सुविधांची उपस्थितांना माहिती सांगितली. तसेच या दवाखान्याचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजू टोम्पे यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अंतर्गत चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत. आता शहरी भागातील रुग्णांना आयुष्मान आरोग्य मंदिरारातून चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांनी आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिराचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
यावेळी डॉ.भाग्यश्री बगाडे, डॉ.पल्लवी कलेटवाड, डॉ.दिपाली गोरे, डॉ.ऋषी कौरवार, डॉ. आयशा नुरीन,राम प्रेमलवाड ,सिध्दार्थ वाघमारे, एकनाथ पठाडे, मंगेश कुलकर्णी, बालाजी काकडे, सुशिल आलेगावकर, सुशिल मुक्कनवार, गोविंद सावरकर, आशिष कुरुडे, कृष्णा निखाते, रिंकू कांबळे, वैष्णवी टाकले, नंदिनी कांबळे, सचिन कंठेवाड सचिन शिंदे,आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्नजित ढवळे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आशा स्वयंसेविका व येथिल राहावसी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.