तुमच्या वाचनात आलं असेल किवा गुरुजी पूजा सांगताना जर कान देउन ऐकलं असेल तर एक गोष्ट लक्षात येइल की भारतवर्षे असा उल्लेख असतो .. त्यावरून मला एक प्रश्न पडला होता तो असा होता की संपूर्ण जगात चारच संप्रदाय आहेत मग इतर देशातील मंडळीकडे हे सगळं कुठे आहे ??.. आपल्यासारखी हरितालिका त्यांच्याकडे नाही.. मग त्यांना चांगला नवरा नको का ??.. भगवान श्रीकृष्णाने याच भुमीत का जन्म घेतला ??.. आणि आता कलियुगात कलीच्या रुपात तो याच भुमीत पुन्हा येणार आहे हे शास्त्रात लिहीलय .. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायला मी काही गोष्टी चाळायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की सुरुवातीला हे सगळं एकच होतं .. म्हणुन ही भुमी पवित्र भुमी आहे आणि जिथे आपण रहातो.. ही व्रतवैकल्य म्हणजे आपल्या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची संधी.. ही पुजा / उपवास म्हणजे आपल्याला हवा असलेला वर आपण निसर्गाकडे मागायचा आणि Law of Attraction यानुसार उत्तमातलं उत्तम आपण स्वतःकडे आकर्षित करायचं.. वडाची पुजा का तर आपल्या नवऱ्याबद्दल आपल्या मनात आदर , प्रेम , ओढ असायला हवं म्हणुन त्याचं महत्व.. भाऊबीज / रक्षाबंधन हे सण गिफ्टसाठी नसुन बहीणभाऊ या नात्याने एकमेकांची काळजी घेणे ..असे अनेक सण हे नात्यांची गुंफण घालतात आणि हे सगळं फक्त भारतात दिसतं..
गेले ३ आठवडे आमच्या सोसायटीमधे एक आज्जी हरितालिका आणि बैलजोड्या घेउन विकायला बसतात.. दोन दिवसांपुर्वी एक लेडी आणि तीची ६/७ वर्षांची मुलगी तिथे आली .. ती मुलगी त्या बाहुल्या हव्या असा हट्ट करत होती… त्या आज्जी म्हणाल्या , बाळा त्या बाहुल्या नाहीत गं .. त्यांच्याशी खेळायचे नसतं तर त्यांची पुजा करायची असते.. मग नवरा चांगला मिळतो.. त्यावर ती मुलगी आईला म्हणाली ,मम्मा तु नाहीकेलीस का गं पुजा ??.. मग तरीही बाबा आपल्याजवळ का रहात नाही ??.. त्यावर तिची मम्मा म्हणाली , पुजाअर्चा करुन काहीही होत नाही उर्वी.. चल आपण जाऊ.. त्या दोघी तिथून निघून गेल्या.. मी आणि आज्जी एकमेंकींकडे पहात राहिलो..
आज्जी मला म्हणाल्या , ताई अहो , अशा आया असतील तर हरितालिकाची बाहुलीच होणार ना… मलाही खुप वाईट वाटलं.. आपली मुलं आपलं अनुकरण करतात त्यामुळे ती व्रतवैकल्य किवा पुजा हा शब्द न वापरता संस्कार म्हणुन वेगळ्या पध्दतीने आणि तिला समजेल असं वैज्ञानिक दृष्टीने तिला समजावु शकली असती.. तिचा बाबा तिच्याजवळ रहात नाही याला कारण पुजा नाही हे तिला समजवायला हवे होते.. खरं तर याच वयात मुलीना हरितालिका व्रत आणि उपवास याचे महत्व सांगायला हवं आणि त्यासाठी आईला ते माहित हवं.. या सगळ्यानी आपण निसर्गाशी जोडले जातो.. पत्री म्हणजे काय ??फुलवात म्हणजे काय ?? वस्त्र म्हणजे काय ??.. कुठल्या फुलाला काय नाव आहे ??.. कृष्णाला तुळस का किवा गणपतीला दुर्वा का या सगळ्याची ओळख यातुन होते.. आणि हे सगळं शिकत असताना आईमुलीचे नाते घट्ट होते.. ती पुढे जाऊन सासूला आई समजून प्रेम करते .. दिराला भाऊ मानते अशा अनेक गोष्टीचे संस्कार नकळत ही व्रतवैकल्ये देतात.. किती मोठं ग्राउंडींग आहे ना हे.. शास्त्राला बाजूला सारुन आधुनिकतेच्या नावावर व्यसनांकडे तरुण पिढी झुकली गेली आहे आणि याला जबाबदार आपण आहोत ..हरितालिका , गणपती अगदीच जवळ आले आहेत.. त्यामुळे अभ्यासपूर्ण नक्कीच जाणून घ्या..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist