…. नउ रंगात सजताना कान्हा
तुझ्याच प्रेमात भिजले.
तुझ्या गुणांसोबत जगताना
राधेलाच माझ्याच पाहिले…….
तुझ्या बासरीत नहाताना
शब्दांनी भिजवले
तुझ्याच सहवासात पार्टनर
नव्याने स्वतःला उलगडले..
निळ्या तुझ्या रंगाने
शाईला गर्व झाला
कागदावर येताना शब्दाना
राधेचा मोह झाला……
किती वर्णू तुझे गुण
अभ्यास माझा झाला
रेखाटताना हृदयातुन तुला
मोरपिसाला बहर आला…
तुला शब्दात बांधताना
शब्दही धन्य झाले
सौंदर्यात तुझ्या रमताना
आयुष्याचे सोने झाले…..
सोनल…. हरे कृष्णसोनल गोडबोले
Sonal Godbole