वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश* भाग 27वा

मासळी बोले आपल्या पिल्याला
खेळ बाळा तू खाली तळाला
दुनिया पाहण्याच्या फंदात पडता
व्यर्थ लागून जाशील गळाला

आम रस्त्याचा भटका भिकारी
तुला पाहून होईल शिकारी
काळ कच्चच खाईल तुला तो
पोट वामनचं गेलं तळाला

अनेक दशकापूर्वी वामन दादांनी दिलेला हा इशारा आजही तंतोतंत लागू पडतो. एकीने रहा. नेकीने रहा. बाहेरच्या झगमगाटास भाळून भलत्याच कळपात सामील होऊ नका. ते तुमची केव्हाही कंदुरी करू शकतात. तुम्ही सावध रहा असा हा मोलाचा संदेश……

पण मासाच्या तुकड्याच्या लालसेपोटी काँग्रेस, bjp च्या गळाला लागलेली मंडळी खोट्या भावविश्वात भावविभोर झालेली आहे. मालकाचा आदेश म्हणून घोड्याला गाढव आणि गाढवाला घोडा म्हणण्याची नमुस्की आमच्या विचारवंत मंडळीवर आलेली आहे.
आज सर्वात कन्फयुज असलेला वर्ग म्हणजे विचारवंत नावाचा प्राणी होय.
यांचा आका कधी धर्मनिरपेक्ष आहे म्हणतो तर कधी सॉफ्ट हिंदू आहे म्हणतो. कधी जानवे तर कधी संविधान घेऊन वावरतो…
लोकसभेत सावरकरांना अपराधी सिद्धकरू पाहतो तर यांच्या मालकाचा उजवा हात असलेल्या आरक्षणाच्या लाभार्थ्याला साक्षात्कार झाला की सावरकर भला माणूस आहे.
एक विचारवंत म्हणतात की बापू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मितृत्वाचे जिव्हाळ्याचे नाते होते……
त्याप्रेमापोटीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर घेण्यात आले. एवढेच नाही तर मंत्रिपद ही देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात इतका जिव्हाळा होता तर काँग्रेसवाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशद्रोही का म्हणत होते? लाहोरच्या जातपात तोडक मंडळापुढे न झालेले भाषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छापले व ते हातोहात विकून गेले तेव्हा बापूनी पत्रातून एवढी आग पाखड का केली?…. 20 जुलै 1942 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हॉइसरॉय च्या मंत्रीमंडळात सहभागी होतात न होतात तोच बापूंनी 9 ऑगस्ट 1942 ला चलेजाव ची घोषणा केली ती कोणाला उद्देशून?
ही घोषणा चार सहा महिने अगोदर करता अली असती किंवा चार सहा महिने नंतर करता अली असती.

आता अजून काही दिवसांनी हे कन्फ्यूज विचारवंत म्हणतील की सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात फार जिव्हाळ्याचे नाते होते.
तुम्ही जर विचारलं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर पटेलांना जोड्याने मारीन म्हणाले होते… तर ते म्हणतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे बोललेच नाहीत. वंचितवाले काहीही बरगळतात..
18 व्या खंडाचा पुरावा दिला तर म्हणतील ती विरोधी पक्षाची चाल आहे.
गांधींवाद आणि आंबेडकरवाद ही दोन टोके आहेत. एक दक्षिण ध्रुव तर दुसरे उत्तर ध्रुव…. एक म्हणतो खेड्याकडे चला तर दुसरा म्हणतो शहराकडे चला. एक वर्ण व्यवस्थेचे, जातीव्यवस्थेचे आणि जातीगत व्यवसायाचे समर्थन करतो तर दुसरा वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था मातीत गाढण्याचा संकल्प करतो. ही दारी एवढी स्पष्ट असताना गांधींवाद आणि आंबेडकरवाद एकच आहे म्हणण्याचा बालिशपणा काही लोक करत आहेत.

आमच्या मनोरुग्ण विचारवंत मंडळीला मानसिक रोगाने पच्छाडलेले आहे. भारतात कोठेही काँग्रेस ची पडझड झाली की त्याला महाराष्ट्रातील महार, उत्तर भारतातले चांभार आणि बाळासाहेब आंबेडकर कसे जबाबदार आहेत, कसे दोषी आहेत हे सिद्ध करण्यात जीवाचा आटापिटा करून घेत आहेत. काँग्रेस ची पडझड ही कन्फ्यूज नेतृत्व आणि त्यांच्या अंतर्गत बंडाळीमुळे होत असून त्याचे खापर आमचे विचारवंत बहन मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर फोडण्याचा सपाटा लावलेला आहे. काँग्रेस हरियाणात हारली ती हेकेखोर वृत्तीमुळे, जातीवादी मानसिकतेमुळे. कारण नसताना कु. शैलजा यांना जातीवरून अपमानित करण्यात आले. अवेळी नको ते वक्तव्य नेतृत्वाने केले.इंडिया गठबंधनचे घटक असलेल्या आप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत न घेता अडमुठेपणा केला आणि हातात येणारे यश हेकेखोर वृत्तीमुळे गमवावे लागले. अनेक ठिकाणी केवळ आप आणि राष्ट्रवादी मुळे काँग्रेस हारली. आता आमचे काँग्रेसची धुनी भांडी करणारे टमरेल विचारवंत आप आणि राष्ट्रवादी ला bjp ची B टीम म्हणण्याचा प्रामाणिकपणा दाखवतील का?

चारसो पार चा मनसूबा आमच्यामुळे रोखता आला असा गोड गैरसमज करून घेतलेल्या कन्फ्यूज विचारवंत मंडळींनी उगीचच टिरी बडवून घेत आहेत. पण चारसो पार ला रोखण्याचे काम EVM विरोधी लोकजागृतीच्या आंदोलनाने केले….
बैलगाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटते की ही गाडी माझ्यामुळे चालत आहे. तशातला हा प्रकार…..
आरक्षणाचे उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर तोंडघशी पडलेल्या काँग्रेसचे समर्थन करताना आमचे कन्फ्यूज विचारवंत म्हणतात.. *उपवर्गीकरणाचे लाखो लोकांनी स्वागत केलेलं आहे. क्रेइमिलेयर चा मुद्दा तर सरकार लागू करणार नाही म्हणून तेव्हाच निकाली काढला आहे….*
सरकारने घेतलेला निर्णय बदललेला आहे असं या दशकात झाले आहे का?
जबर विरोध झाला तर चार पावले मागे जाण्याचे धोरण सरकार राबवित आहे. पण धोरणात बदल केलेले नाही. मग तो मुद्दा किसान आंदोलनाचा असो,खाजगीकरणाचा असो की सरकारी मालमत्ता बे भावात विकण्याचा मुद्दा असो. तसेच काही क्रिमिलेयर च्या बाबतीत सरकारने रडक्याचे डोळे पुसलेले आहेत. म्हणून ऍड. बाळासाहेब आंबेडकर हा मुद्दा घेऊन महाराष्ट्रभर दौरे करीत आहेत.
अनु. जाती जमातीच्या आरक्षणाला हातच लावता येत नाही असा संकेत असताना सरकार त्यात चंचुप्रवेश करू पाहत होते. त्यात त्यांना यश आले. आता पुढे काय करायचे हे ते बेमालुमपने करत राहणार…….
आमच्या रसदी विचारवंताचे म्हणणे आहे की बाळासाहेब आंबेडकर झुंडशाही चालवतात…..
याचे उत्तर तुकोबाच्या एका अभंगात आहे.
*भले तो देऊ काशेची लंगोटी*
*नाठाळाचे माथी हाणू काठी*
माझा अपमान केला असता तर मी वल्लभभाईंना जोड्याने मारले असते
असे धाडसी विधान करणाऱ्या रक्ताच्या
वारसाचे बाणेदारपणे बोलणे, चालणे, वागणे काँग्रेस जणांना झुंडशाही वाटते. फेकलेला तुकडा घेऊन बसणारे तर खूप आहेत. निवडणूक जाहीर होऊद्या मुंग्या सारखे बिळातून बाहेर पडतील आणि सौदेबाजी करतील आणि म्हणतील आम्ही विचाराचे वारस आहोत. पण एक लक्षात ठेवा की जातीच्या सेल चे कार्यकर्ते होऊन हुजरेगिरी करत बसाल, नको त्या मुद्द्याचे समर्थन करत बसाल तर पदोपदी अपमानित व्हाल……लोक तुम्हाला जवाब दो म्हणून घरापर्यंत आले की बिळात लपून कांगावा करण्याची वेळ येईल… मग मी पुरुष आहे, मी स्त्री आहे असे रडगाणे गाण्याची वेळ येईल.
धम्म पदात एक गाथा आहे
जे काम केल्याने पश्चाताप करावा लागेल अशी कामे न केलेली बरी

एक जुना फॉर्मुला आहे की जेव्हा विरोधक रात्रंदिवस तुमच्यावर टीका टिप्पनी करतात तेंव्हा तुम्ही तुमच्या ध्येय उदिष्टानुसार काम करीत आहात हे सिद्ध होते. जेव्हा विरोधक तुमचे गुणगान करतात तेंव्हा समजून घ्या की ते तुमची नसबंदी करणार, कंदुरी करणार हे निश्चित…….
आज EVM आणि सत्ताधारी राहिले बाजूलाच पण कन्फ्यूज लोकांची टोळी केवळ राजगृहाच्या दिशेने तोंड करून भुंकण्याचा सपाटा लावलेला आहे. यांना bjp सत्तेतून बाहेर पडावी असे वाटतच नाही.. हा मूळ मुद्दा आहे. आग रामेश्वरी तर बंब सोमेश्वरी असा प्रकार चालू आहे….
हरियाणात जे झाले ते महाराष्ट्रात होऊ नये…… कोणी जातीवरून अपमानित होऊनये
यांचे कन्फ्यूजन दूर होऊन
यांना सुबुद्धी प्राप्त होवो हीच अपेक्षा

गणपत गायकवाड नांदेड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *