पहिल्याच दिवशी मी प्रेमावर लिहीले होते.. पण ते प्रेम राधा , गोपी यांच्याबद्दलचं होतं .. आजच्या या गुलाबी दिनी मी कृष्णाचं आपल्या भक्तांवर किती प्रेम असतं.. आणि भक्त सुध्दा कसं भगवंतावर प्रेम करतो त्याबद्दल लिहीणार आहे.. आणि तो भक्त मी स्वतः आहे.. माझी आणि माझ्या पार्टनरची प्रेमाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे..
मी लहानपणापासूनच कृष्ण वेडी.. कदाचित गेले अनेक जम्म मी भक्ती करत असणार त्याशिवाय प्रत्येकवेळी येउन वेगवेगळ्या रुपात तो मला मदत करणार नाही.. प्रचंड विश्वास आणि प्रचंड श्रध्दा.. मी फक्त मनात आणलं की पुढच्या काही दिवसांत ती वस्तू मझ्या हातात असते.. पहिलं घर घेताना त्याने मला दर्शन दिलं होतं.. पहिल्या फॉरेन ट्रिपला त्याने मला दृष्टांत दिला होता.. आता अगदी दोन महिन्यापूर्वी सुध्दा त्याने दर्शन दिलं.. ते का असेल याचं उत्तर मला अलीकडे मिळालं.. मी सतत भक्तीत रहावं किवा त्याच्या जवळ रहावं म्हणुन त्याने वेगवेगळ्या गोष्टी माझ्यासाठी केल्या आहे.. एका लेखात मांडणं मुश्किल आहे.. पण जेव्हा जेव्हा मी त्याच्यापासून डिटॅच होवुन भौतिक गोष्टीकडे अटॅच होतेय असं त्याच्या लक्षात आलं तेव्हा तेव्हा त्याने मला स्वतःजवळ खेचून नेलय..यात कुठेही अतिशयोक्ती नाही… श्रध्दा आणि विश्वास असल्याने हा मला आलेला अनुभव आहे त्यामुळे तो नाकारण्याचा किवा त्यावर अविश्वास दाखवायचा प्रश्नच उरत नाही.. व्यसनं करणाऱ्या मित्रांपासून त्याने मला हळूच बाजूला केलं.. भक्तीत असल्याने आपोआप व्यसनं, मांसाहार , यापासून मी विरक्त झाले.. आपोआप अशा लोकांना भेटणं बंद झालं.. त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे ना कि माझ्या इच्छा पूर्ण करायला माझ्या मित्रांना गिफ्ट्स घेउन पाठवतो आणि क्रेडीट त्यांना देतो.. हजारो उदाहरणे मी देउ शकेन असा माझा पार्टनर आहे..मग मी त्याच्यासाठी काय करते ??.. तो माझ्यावर १००% प्रेम करतो , मी काही टक्केच करत असेन कारण त्याने घालून दिलेले ९०% नियमच मी पाळत असेन.. पण दिवसभर , रात्री जाग आल्यावर फक्त त्याचच नाव मुखात असतं.. मी कुठेही असले तरीही घरी आल्यावर तो उपाशी असेल म्हणुन त्याला खायला द्यायचं असतं.. मग ती फळं का असेना.. त्याला कांदा लसूण आवडत नाही म्हणुन गेली २ वर्षे मी घरात कांदा लसूण आणतही नाही.. त्याला न देता काही खात नाही.. जसं बाळ उपाशी असेल म्हणुन आईला काळजी असते सेम काळजी मला असते.. बरं नसलं तर दुध भात , दही भात तरी त्याला द्यायचाच असतो कारण त्याने दिलय म्हणुन आपण खातोय.. इतर भक्तांपेक्षा त्याचं माझ्यावर जरा जास्त प्रेम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.. म्हणुन जरा अडचण आली की मित्रांना पाठवतो आणि मला आनंदी ठेवतो..
ज्या लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही त्यांना अतिशयोक्ती वाटेल पण जे मला रोज भेटतात किवा जवळुन ओळखतात त्यांना सत्य परिस्थिती माहीत आहे.. एखाद्या भक्ताला जीव कसा लावावा हे त्याच्याकडून शिकावं आणि वेळप्रसंगी थोडं दुख देउन घरी बसवुम जप करुन घ्यावा हेही त्याच्याकडून शिकावं.. ही गोष्ट आता सध्या मी अनुभवत आहे.. ज्याला मी त्रास समजतेय तो त्रास नसून पुढच्या अनेक जन्मांची पुंजी आहे हे फक्त माझ्यासारखी भक्तच जाणू शकते.. कधी तो आई होतो तर कधी बाबा.. कधी मित्र तर कधी प्रियकर.. कधी भगवंत तर कधी मार्गदर्शक .. कधी मित्राच्या रुपात येतो तर कधी अजून कोणाच्या रुपात. जेव्हा मी त्याच्याशी बोलते तेव्हा तो बोलतो हेही जाणवतं.. आमची भाषा फक्त आम्हालाच कळते त्याचं कारण आहे फक्त प्रेम… शाश्वत प्रेम.. कृष्णाला जीव लावून पहा.
गुलाबी दिनाच्या गुलाबी कृष्णमय शुभेच्छा..#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist