कंधार : ( महेंद्र बोराळे )
श्री हनुमान मंदिर मंगल कार्यालय,विजय नगर नांदेड येथे स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गेल्या आठवड्याभरात करण्यात आले होते. त्यास जिल्ह्यातील स्काऊट मास्टर्स नी भरभरून प्रतिसाद दिला अशी माहिती स्काऊट जिल्हा संघटक जनार्दन इरले यांनी आज १३ ऑक्टोबर रोजी दिली .
सदर शिबिराचे उद्घाटन संग्राम कांबळे गटशिक्षणाधिकारी पं.स.नायगाव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान प्रात्यक्षिक,लेखी व तोंडी अशा विविध स्वरूपात अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्यात आला. शिबिरास डॉ सौ सविता बिरगे ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचांगे, गंगाधर राठोड गटशिक्षणाधिकारी पं.स.किनवट या मान्यवरांनी भेटी दिल्या.
स्काऊट जिल्हा संघटक श्री जनार्दन इरले ,गाईड जिल्हा संघटक श्रीमती शिवकाशी तांडे मॅडम, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट गाईड श्री प्रलोभ कुलकर्णी ,स्काउट मास्टर प्राथमिक शिबिराचे प्रमुख म्हणून मा. मधुकर घोडके(LT), मा.रमेश फुलारी (ALT)यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले .
शिबीर सहायक म्हणून विनोद सोनटक्के , हेमंत बेंडे ,सतीश वाकोडे,गायकवाड, गळेगावे
गाईड कॅप्टन प्राथमिक शिबिराच्या शिबिर प्रमुख म्हणून जिल्हा संघटक गाइड सहायक श्रीमती भगीरथी बच्चेवार , उषा नळगिरे , श्रीमती ज्योती शिंदे , श्रीमती मंजुळा जाधव, श्रीमती वैजयंता सुकरे यांनी कार्य केले
श्री हनुमान मंदिर मंगल कार्यालयाचे अध्यक्ष भोसले साहेब, सचिव श्री संभाजी शिंदे ,श्री ढगे सर इतर मान्यवर उपस्थित राहुन स्काऊट व गाईड प्रशिक्षण शिबीरास सहकार्य केले . गरूड संघ व्याघ्र संघ, अश्व संघ, गज संघ,मयुर संघ, सिंह संघ अशाप्रकारे ग्रुप तयार करून वेगवेगळ्या दैनंदिन उपक्रम राबविले . भारत स्काऊटर व गाईडडर प्राथमिक शिबिर सोहळ्यात स्काऊटर 98 तर गाईड 125 सहभागी झाले .
गरूड संघ प्रमुख विजयकुमार नारायण काळे (संघ नायक),महेंद्र निवृत्ती कांबळे ( उपसंघ नायक),रविकुमार गणेश पवार,श्रीकांत सटवाजी थोटवे ,धनंजय लक्ष्मण औताडे,विश्वांबर प्रभाकर बोकडे ,महेंद्र विठ्ठलराव बोराळे,सतिश नारायणराव तोटावार,सुधाकर गोपाळराव मुखेडी ,संजय जयराम बाघमारे,हेमंत शरदराव देशपांडे, मारोती माधवराव तमन्ना,संतोष आनंदराव सोनकांबळे ,संतोष बाबुराव लिंबुचे ,समर्थ कोंडीबा एकाळे,अमोल जिवतोडे चंद्रपूरकर ई. स्काऊट मास्टर प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.