राधा …

 

सलग १० दिवस कृष्णावर लिहील्यावर मी राधेवर लिहीणार आहे पण कृष्णाच्या राधेवर नाही बरं का , कारण माझी ती योग्यताच नाही.. मी लिहीणार आहे अशा राधेवर जी सगळ्या समस्त पुरुषांच्या मनात असते.. आपलं मन अथांग आहे.. जसा समुद्राचा तळ शोधू शकत नाही तसच प्रत्येक पुरुषांच्या मनातील राधेचा शोध आपण घेउच शकत नाही पण तरीही हा वेडा प्रयत्न.. म्हणुन बियॉन्ड सेक्समधे मी राधा ४ ओळीत लिहीली आणि मीरा १०० ओळीत सामावली.. ४ ओळीतील राधा मीरेपेक्षा लोकांना जास्त भावली कारण ती राधाच होती.. धारा उलट दिशेने वहायला लागल्या आणि राधेचा जन्म झाला ..

मी धारा चा अर्थ विचार किवा प्रवाह असा घेतला आहे.. घरात बायको असताना जेव्हा राधा खुणावते तेव्हा त्याच्या हृदयाची गती तेज होते कारण असतं बदल पण मग राधा मनात डोकावते तेव्हा तिला जपणार आणि प्रेयसी म्हणुन तिचा आदर करणार हा भाव नसुन तिथे सेक्स / वासना डोकावते आणि भाव नष्ट होवून त्याला तिच्यात स्त्री दिसते.. राधा ही स्त्री नसून तो शृंगार आहे.. तो निसर्गाचा लय आहे.. ती लाटेची कमान आहे .. ती तारुण्याची झालर आहे.. जी सृष्टीच्या निर्मात्याला भुरळ घालू शकते ती अखंड तेवणारी ज्योत आहे.. सर्वसामान्य माणसाच्या हृदयात जी राधा असायला हवी ती विचारांच्या भव्य वेगात विलीन होणारी हवी पण वासना आली की तो वेग मंदावतो आणि सौंदर्य न दिसता फिगर दिसायला लागते जी कधीही कायमस्वरूपी तशीच रहाणारी नसते हे तो विसरतो आणि राधेच्या विरूध्द प्रवाहाकडे वहात जातो.. राधा फक्त त्यांच्याच हृदयात राहु शकते ज्यांच्यासाठी तिला पहाण्याची आत्मीय ओढ असते.. कारण शरीर आलं की विकार आले आणि जिथे विकार तिथे विचार टिकत नाहीत.. राधा हे सुविचार आहेत जे कोणाला अंगिकारायचे नाहीत म्हणुन अशा पुरुषांच्या जवळ ती फिरकतही नाही.. राधेला जवळ करायला उपासना हवी..

राधा मिळायला भाग्य हवं फक्त बियॉन्ड सेक्स वाचून मीरा / राधा सापडणार नाहीत तर त्याच्या पलीकडे प्रेम ही सुंदर भावना आहे जी लुप्त झाली आहे.. लुप्त झालेली सुंदर गोष्ट परत येइल का ??.. एका वेळी अनेकींवर प्रेम ( फेक / शरीर सुखासाठी ) करणारे पुरूष राधेला कधीही हृदयात साठ्वु शकत नाहीत.. कारण ती साठवण्याची कलाकृती नसून दृष्टीपलीकडे असणाऱ्या पटलावर कोरण्याची नाजूक नक्षी आहे.. जो ती हळुवार रेखाटतो तोच राधेला खऱ्या अर्थाने स्पर्श करु शकतो.. रा रामाचा आणि धा त्याच्या धामातला म्हणजेच काय जिथे पावित्र्य आहे तिथेच राधा जगते आणि जिथे राम आहे तिथेच ती स्थिरावते.. पुरुषांना बायको सोडून अजून एक राधा हवी असेल तर त्यांना राम / कृष्ण समजून घ्यायला लागतील कारण कुठलीही अवघड गोष्ट जेव्हा आपण मनात आणतो तेव्हा तिचा अवघड अभ्यास हा महत्वपूर्ण असतोच..

एखाद्या कलाकृतीला आपण फॉलो करतो तेव्हा ती विचारांच्या गाभाऱ्यात बसवुन संस्काराची फुलं वाहिली तरच अशा सुबकतेला अर्थ प्राप्त होतो.. प्रेयसी मिळणं सोशल मिडीयामुळे सहज सोप्पं झालय पण राधा…….. ???..
पहा विचार करुन , नक्कीच जाणवेल की अवघड आहे पण अशक्य नाही .. ..
सोच बदलो..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

 

..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *