संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेत नांदेड जिल्ह्यासाठी २१ कोटी ९० लक्ष रुपयाचा निधी

 

*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*

संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना महाराष्ट्रात पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने सुरू केली असून या योजनेचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील बंजारा लमान तांड्यांना महसूल दर्जा देऊन ग्रामपंचायत निर्माण करणे आहे यानंतर बंजारा लमान तांड्यांना ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तांड्यांना तीस लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे

 

याचा पहिला हप्ता नांदेड जिल्ह्यासाठी २१ कोटी ९० लक्ष रुपयाचा उपलब्ध झाला असून महाराष्ट्रासाठी मिळालेल्या शंभर कोटी रुपयांमध्ये नांदेडला २१ कोटी ९० लक्ष रुपये मिळून देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समितीचे सदस्य भगवान राठोड ,संध्याताई राठोड ,प्रकाश राठोड, कैलास खसावत यांनी राज्यस्तरावर प्रयत्न करून आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेलं आहे, आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा आणि बंजारा लमान तांड्याचा विकास व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्य दूत रामेश्वर नाईक, यांच्याकडे सतत पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे.

ही योजना महाराष्ट्रासाठी नवीन असून नांदेड जिल्ह्यात ७५० पेक्षा जास्त बंजारा लमान तांडे आहेत या पैकी २१३ तांड्याना पाहिला हप्ता भेटलेलं आहे,
किनवट ६२,कंधार २९, लोहा ११ देगलूर ४, नांदेड ५ नायगाव ३ भोकर १२ माहूर १२ मुखेड २६ मुदखेड ६ हदगाव १२ हिमायतनगर २८, अर्धापूर ३ असे एकूण २१३ तांड्याना २१ कोटी ९० लक्ष रु निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे, नांदेड जिल्ह्यात जास्तीत जास्त तांडे ग्रामपंचायत निर्माण व्हावी म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय बैठका व तांड्याचा प्रवास अशासकीय सदस्यांनी केला असून वेळोवेळी राज्यस्तरावर झालेल्या बैठकीत जिल्ह्याला जास्तीचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केलेला आहे, येणाऱ्या काळात या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तांड्याना केंद्र सरकार चा निधीचा हप्ता येणार आहे,

 

या यजनेत मूलभूत सुविधा पुरवून तांड्याचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने तांडा विकास बोर्ड स्थापन केलेला आहे. केंद्राच्या तांडा विकास बोर्डा कडे राज्यातील बंजारा लमान तांड्याचे आराखडे पाठवून् राज्याकडून मागणी केंद्र सरकार कडे गेली असल्याचे अशासकीय सदस्यांनी सांगितले , या योजनेला राज्याचा ३०% आणि केंद्राचा ७०% निधी उपलब्ध होणार आहे जिल्ह्यातील बंजारा तांड्यांना पहिला हप्ता २१ कोटी ९० लक्ष रुपयाचा मिळाल्याने येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारचा ७०% चा निधी उपलब्ध होणार असून विकासापासून वंचित असणाऱ्या बंजारा लमान तांड्याचा विकास होणार आहे

 

याविषयी बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून विकास कामे दर्जेदार व्हावीत म्हणून बंजारा समाजाने याविषयी सतर्क रहावे असे आव्हान भगवान राठोड यांनी केले आहे सदरील विकास कामे ग्रामपंचायत मार्फत होणार असून ज्या ज्या तांड्यामध्ये विकास निधी मंजूर झाला आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवकांनी अंदाजपत्रक बनवून तांत्रिक मान्यता घेऊन लवकरात लवकर कामे सुरू करावीत यासाठी सर्व अशासकीय सदस्य प्रयत्न करत असल्याचे भगवान राठोड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *