कंधार ; ( दत्तात्रय एमेकर )
जगात १८७४ या वर्षी २२ देशात टपाल सेवेला सुरुवात झाली.पण १९६९ पासून जागतिक टपाल दिन साजरा करण्याची पध्दत सूरू झाली.वर्तमान काळ हा विज्ञानाभिमुख असल्यामुळेच सोशल मीडिया,वेबसाइट, मेलचे अधुनिक युग प्रगतीपथावर आहे.आमच्या भारतीय डाक सेवेचे अनेक माध्यम इतिहासाच्या गर्तेत नामशेष झाले आहेत.या अधुनिक काळातल्या शालेय विद्यार्थ्यांना डाक सेवेचे पोस्टकार्ड, अंतर्देशियपत्र,लिफाफा,मनी ऑर्डर, पोस्टाचे तिकीट अशा माध्यमांची तोंड ओळख सध्याच्या होकमपट्टीच्या अधुनिक विद्यार्थ्यांना अनुभव घेता यावा म्हणुन हा उपक्रम टपाल दिन म्हणून साजरा करण्यात आला.ऐतिहासिक कंधार शहरातील नामांकित अशी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेतील मातृशाळा श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार ज्ञानालयात ९ ऑक्टोबर २०२४ रोजी जागतिक टपाल दिनी १०१ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची आन-बान-शान असलेली मायबोली महाराष्ट्री भाषेला सन्माननीय प्रधानमंत्री नरेद्रभाई मोदी साहेब व त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली अभिजात भाषेची मागणी मान्य करीत अभिजात भाषेचा दर्जा दिला.त्या बद्दल पंतप्रधान मोदींना आभाराभिनंदन पत्र लिहून मानाची कोटी कोटी जयक्रांति विद्यार्थांनी केली.
दुसरे अभिनंदन पत्र महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब व त्यांच्या मंत्रीमंडळाने कंधार शहराजवळील एम.आय.डी.सी.फुलवळ या परीसरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मन्याड खोर्यातील ढाण्या वाघ,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार,महाराष्ट्राचे नव्हे भारतातील शिक्षण महर्षि,विद्रोही विचारवंत, आदर्श संपादक, उत्कृष्ट साहित्यिक सन्माननीय डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचे नाव देऊन “डाॅ.भाई केशवराव धोंडगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करुन इतिहास घडविणारे आणि जतन करणारे व्यक्तीमत्व आदरणीय डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचा गौरव केला.त्या बद्दल १०१ विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड, अंतर्देशियपत्र,लिफाफा या माध्यमा व्दारे आभाराभिनंदन करुन मानाची कोटी-कोटी जयक्रांति करणार्या कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या प्रसंगी कंधार डाक सेवेचे प्रमुख अधिकारी आदरणीय दीपकराव पोटदुखे सर सोबत आदरणीय प्रदीप जायभाये सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मानवरांचा ह्रदय सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर आणि उपप्राचार्य प्रा.मुरलीधर घोरबांड सर, उपमुख्याध्यापक सुरेश ईरलवाड सर, प्रभारी पर्यवेक्षक ऐनोद्दीन शेख सर यांच्या समर्थ हस्ते सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून पोस्टाच्या लाल रंगाच्या पत्रपेटीत पत्र टाकण्याचा अनुभव विद्यार्थांनी प्रथमच घेतला.यात कु.अन्वयी जाधव, कु.आराध्या अंबुलगेकर, कु.अनन्या,राठोड,कु. सोनल कोतवाल,कु.मेंढके,श्रेया सातापूरे,श्रेया मुसळे,कु.कागणे,कु.शीतल पेठकर, कु.सूर्यवंशी,कु.सोनाक्षी सर्जे,कु.पेठकर,बाल चित्रकार रमाकांत जोंधळे,बुध्दभुषण ढवळे, साहित्यिका सौ अंजलि कानींदे/मुनेश्वर, यांनी या पत्र लेखनात सहभाग घेवून कल्पक, सृजनशील दत्तात्रय एमेकर गुरुजी यांच्या पुढाकाराने जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला.