शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले कंधार येथे मार्गदर्शन ; मुलींच्या सुरक्षितेबाबत सजग राहण्याचे आवाहन ..!

महावाचन अभियानात कंधार तालुक्याचे उत्कृष्ट कार्याबद्दल गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

महावाचन अभियान उत्सव 2024 राज्यासह नांदेड जिल्हात प्रभावीपणे झाले . त्यामध्ये कंधार तालुक्याने या अभियानात जिल्हयात उत्कृष्ट कार्य करत टॉपटेन मध्ये नंबर मिळवला त्याबद्दल गटसाधन केंद्र पंचायत समिती कंधार येथे दि .१६ ऑक्टोबर रोजी आयोजीत शैक्षणिक बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर , निरंतर शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांच्या हस्ते कंधारचे गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी मुलींच्या सुरक्षितेबाबत शाळा प्रशासनाने अद्यावत सिसीटीव्ही कॅमेरे शाळा आणि परिसरात बसवा व सुरक्षितेबाबत सजग राहण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी कंधार येथे केले .

 

गटसाधन केंद्र कंधार येथे फुलवळ , शिराढोण , बहादरपुरा , कंधार या केंद्रातील सर्व माध्यमांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली . गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांचा हस्ते
मा .शिक्षणाधिकारी माधव सलगर ,
निरंतर शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे , शिक्षण उपनिरीक्षक माधव शिंगडे , हनमंत पोकळे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . शिक्षणविस्तार अधिकारी वसंत मेटकर , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख प्रविण पाटील , माधव कांबळे यांच्यासह केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी नवभारत साक्षरता ( एनआयएलपी ) , शहरातील शाळेच्या वेळात बदल करण्यात यावा , इन्स्पायर अवार्ड , लाभाच्या सर्व परीक्षा घेण्यात यावा , बदलापुर घटणेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळेत विशाखा समिती , सखी सावित्री , सिसीटीव्ही , स्वच्छता गृहात तक्रार पेटी बसवने याबाबत लवकरात लवकर अमलबजावणी करण्या यावी असे आवाहन करण्यात आले .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *