काॅंग्रेसने अजून एक ही उमेदवार जाहीर केलेला नसताना देगलूर बिलोली मतदारसंघात असा नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे की काॅंग्रेसने बौद्धांवर अन्याय केला आहे.काॅंग्रेसतर्फे राज्यसभेत चंद्रकात हंडोरे,मुकुल वासनीक तर लोकसभेत वर्षा गायकवाड,बळवंत वानखेडे हे बौद्ध समाजाचे नेते प्रतिनिधित्व करत आहेत.विधानपरिषदेवर ही काॅंग्रेस बौद्ध समाजालाच प्राधान्य देत आली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात 3 मंत्री SC होते आणि ते 3 ही बौद्ध समाजाचेच होते.
महाराष्ट्रात SC साठी एकूण 29 जागा राखीव आहेत.त्यापैकी काॅंग्रेसच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या बहुतांश जागावर काॅंग्रेस बौद्ध उमेदवारच देणार आहे.मराठवाडा आणि प.महाराष्ट्रात बौद्धांसोबतच मातंग,चर्मकार आणि अनुसूचित जातीतील इतर समाज ही मोठ्या प्रमाणात असल्याने काॅंग्रेसला काही जागांवर मातंग,चर्मकार समाजाला पण प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे. देगलूर,मुखेड,नायगाव या ३ विधानसभा मतदारसंघात SC मध्ये सर्वाधिक मतदार हे मातंग समाजाचे आहेत मातंग समाजाचा वंचित बहुजन आघाडी,RPI चे वेगवेगळे गट,बसपा, पॅंथर, बहुजन मुक्ती पार्टी सारखा स्वतःघा कोणताही स्वतंत्र पक्ष नसल्याने ते पारंपारिक काॅंग्रेसचे मतदार आहेत.जिल्हा परिषद,पंचायत समीती नगरपालिका पासून ते लोकसभा विधानसभा निवडणुकीत 90% पेक्षा जास्त मतदान मातंग समाजाचे काॅंग्रेसलाच होते.
सर्वच्या सर्व राखीव जागांवर बौद्ध उमेदवार दिल्यास बाकीचा SC समाज जो काॅंग्रेसचा पारंपारिक आणि हक्काचा मतदार आहे तो काॅंग्रेसपासून कायमचा दुरावला जाऊ शकतो याच भुमिकेतून देगलूर मतदारसंघात काॅंग्रेस मातंग समाजाचा उमेदवार देल्यास यात बौद्ध समाजावर अन्याय कोठून झाला ? मातंग समाजाला काॅंग्रेसने लोकसभा,राज्यसभा, विधानपरिषदेवर उमेदवार दिली नाही विधानसभेच्या फक्त 1-2 जागेवर मातंग समाजाला काॅंग्रेस संधी देते त्या ही जागा काढून त्या बौद्ध समाजाला द्या अशी मागणी होत असेल तर मातंग समाजावर ते अन्यायचे ठरेल.उद्या काॅंग्रेसची सत्ता आली तर बौद्ध समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळणारच आहे, त्यामुळे बौद्ध बांधवांनी पण सामाजिक न्यायाची भुमिका घेणे अपेक्षित आहे.
लोकसभा निवडणुकीत पडलेल्या मतांची बुथवाईज analysis करून, मतदारसंघातील लोकसंख्या आणि समीकरणे पाहून, वेगवेगळे सर्वे करूनच उमेदवार देणार आहे त्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी फेक नरेटीव्हला बळी न पडता काॅंग्रेस जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहावे.