मतदान यंत्र अन् मतदार राजा यांच्यातील कलगी-तुरा..!————लेखन-दत्तात्रय एमेकर गुरुजी.

 

मतदार राजा—-
काय मतदार यंत्रा तुझे सुगीचे दिवस आले वाटते.
मतदान यंत्र—-
होय रे पुर्वी मतदान करतांना बॅलेट पेपरवर शिक्का मारुन मतपेटीत टाकत होते.तेंव्हा अनेक मत बाद होत असत.कधी कधी तर धुर्यावर शिक्का मारला गेला की मतमोजणी अधिकारी वर्गाची तारांबळ उडत असे.पण माझ्या मुळेच वेळ वाचुन मतदान व्यवस्थित पार पडले जाते.
मतदार राजा —-
तूझी निर्मिती तत्कालीन सत्ताधाऱ्यानी करून आता तेच तूझी बदनामी करून डिजिटल युगात तुझ्यावरचं संशय घेत आपल्या पराभवाचे खापर तुझ्यावरचं फोडतं आहेत.
मतदान यंत्र——-
अगदीच बरोबर बोललास तू मित्रा त्यांची सत्ता गेली त्यांच्या धेय्य धोरणामुळेच पण……माझ्यावर आरोप टाकुन त्यांना नामानिराळे होता येत नाही. बरं का?
मतदार राजा—-
डिजिटल युगाचे नाव पुढे करून तुला त्यांनीच निवडणुकीत आणले.आता सत्ता गेल्याने गत सत्ताधिशांच्या संशयाने तुला आरोपीच्या पिंजर्यांतच उभे केले.
मतदान यंत्र—-
मला वाटत होते जगातील विशाल लोकशाहीच्या देशात माझ्यामुळे मतदान प्रक्रियेत क्रांती झाली असे वाटत होते.पण….तसे न होता स्वार्थी पराभूत उमेदवारने व नेत्यांनी माझ्या वर संशय घेवून माझे अस्तित्व संपवण्यासाठी अनेक प्रचारपीठावरुन स्वार्थी कोल्हेकुई चालू ठेवली.
मतदार राजा——
अगदी बरोबर बोललास जर तुला हॅन्ग करता आले असते तर……..तत्कालीन सत्ताधारी पक्षांची सत्ता कधी गेलीच नसती.वर्तमानी सत्ताधार्यांना 70 वर्ष विरोधी रहावे लागले.तेंव्हा त्यांनी बॅलेट पेपर हटवा असे कधी म्हटले का?नाही ना हं एखादा तुझा सवंगडी नादुरुस्त असेल ही शेवटी यंत्रच ना तुम्ही पण…एका उदाहरणावरून सर्वांना दोषी दोषी धरणे कितपत योग्य आहे.
मतदानयंत्र—–
अगदी बरोबरच आहे तुझे माझा मालक भारतीय निवडणुक आयोग माझ्या समर्थनार्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे म्हणून मला जरा बरे वाटते आहे. सत्तेच्या विरोधकांना मी स्वप्नात पण दिसत आहे.जसे मुघलांना संताजी-धनाजी दिसत त्यासम दिसत आहे. पण मी एकटा थोडाच आहे माझ्या सोबत VV पॅड अन् CU व BU हे तिघेही आहोत तरीही माझ्यावर संशयाची पाल चुकचुकते.
मतदार राजा——-
पण मतदान कक्षातील अधिकारी तुझ्यावर करडी नजर ठेवून मतदान मतदारा कडून करुन घेतात. कोणी ही आपली नोकरी माझ्यासाठी घालत नाही. पण…राष्ट्रीय पक्ष असो वा प्रादेशिक पक्ष निकाल लागल्यानंतर पराभवाचे खापर तुझ्यावरचं फोडतं.
मतदान यंत्र——-
तस पाहिल्यास भारतीय संस्कृतीत सत्याने वागतो त्यांच्या मागे शुक्लकाष्ट….हे अनादीकाळा पासून आजतागायत सुरुच आहे…म्हणतात ना सत्त्य परेशान हो सकता हैं,लेकीन पराजित नहीं!बॅलेट पेपरने अनेकांना बोगस मतांच्या आधारे निवडले पण..न्याय देवतेने पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर न्याय देवून त्यांची निवड हिसकावली याची उदाहरणे बरीच आहेत.कंधार व लोहा तालुक्यात जिल्हा परिषद व आमदारकी निवडणुकीत भुतकाळाने आपल्या डोळ्याने पाहिली आहेतच!
अधिकारी——
मघा पासून तुम्हा दोघांचा कलगी-तुरा निमुटपणे ऐकत आहे.आपल्या भारतीय निवडणुक आयोगाने कोण्या एका पक्षाला सत्ताधिशांच्या खुर्चीत बनविण्यासाठी मतदान यंत्र नसून भारतीय विशाल लोकशाहीत डिजिटल युगाचा उपयोग करुन संगणकिय युगात मतदान यंत्रावर मतदान घेवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोखण्यासाठी हे मतदान यंत्र अवलंबले.
मतदारराजा——
जो उमेदवार पराभूत झाला तो पराभवाचे खापर मतदार यंत्रावरच फोडणार हे नक्कीच!
मतदान यंत्र–
जावू दे रे मी कितीही प्रामाणिक वागलो तरी माझ्यावर आरोप तर होणारच होणार! माझा उपयोग भारतीय निवडणुक आयोग करणारच हे मात्र नक्कीच!
बरं येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान केंद्रावरच भेटू आता मला ट्रेनिंग मध्ये व्यस्त रहावे लागेल.!
शेवटी मला चालवणारे केंद्राधिकारी व सर्व टिमचे आणि भारतीय निवडणुक आयोग आणि निवडणुक प्रक्रियेत सेवा देणारे सर्व सेवाचार्यांचे मनसोक्त आभाराभिनंदन करुन मानाचा जयहिंद करतो..!अरे हो राहिलेच की माझे लोकशाहीच्या मतदार राजांना बोलके करत संवादाचा कलगी-तुरा मांडल्या बद्दल गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांच्या लेखनीचे आभाराभिनंदन करुन थांबतो!धन्यवाद जयक्रांति! ,जय महाराष्ट्र!,जयहिंद!,जय संविधान!, जय लोकशाही!जय निवडणुक आयोग! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *