नागार्जुना पब्लिक स्कुल येथे दक्षिण मतदार संघाच्यावतीने प्रथम प्रशिक्षण प्रशिक्षणात ८८४ जणांचा सहभाग…! प्रशिक्षणाची तयारी पूर्ण

 

#नांदेड दिनाक २५ ऑक्टोबर: नांदेडविधानसभा सार्वत्रिक निवडणूक तथा लोकसभा पोट निवडणूक 2024 च्या नांदेड दक्षिण 087 प्रथम प्रशिक्षण उद्या 26 ऑक्टोबर २०२४ रोजी नागार्जुना पब्लिक स्कूल,कौठा,नांदेड येथे होणार आहे.

या प्रशिक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे. सदरील प्रशिक्षण तयारीचे अवलोकन करण्यासाठी डॉ सचिन खल्लाळ, निवडणूक निर्णय अधिकारी,087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड , प्रविण पांडे,तहसीलदार, नांदेड, नितेशकुमार बोलेलू, नायब तहसीलदार निवडणूक विभाग,नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवाड व रविंद्र राठोड यांनी प्रत्यक्ष येवून पाहणी केली. सदरील प्रथम प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी असे दोन्ही एकूण 884 जणांचे प्रशिक्षण होणार आहे. सदरील तयारी पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण टिमचे पेशकार राजकुमार कोटुरवार, रुस्तुम आडे, संजय भालके, राजेश कुलकर्णी,बालासाहेब कच्छवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
०००००
#विधानसभानिवडणूक२०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *