नांदेड जिल्ह्यात विधानसभेसाठी आतापर्यंत 46 इच्छुकांचे 55 #अर्ज दाखल लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल

 

· शुक्रवारी एकाच दिवशी 27 इच्छुकांचे अर्ज दाखल
· आता सोमवार व मंगळवारी अर्ज दाखल करता येणार

#नांदेड दि. 25 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 7 इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून 9 विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत चार दिवसात 44 इच्छुकांचे एकूण 55 अर्ज दाखल झाले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 18 #इच्छुकांनी 32 नामनिर्देशनपत्र प्राप्त केली. आतापर्यंत 74 इच्छुकांनी 131 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. आतापर्यंत एकूण 7 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आजपर्यंत अपक्ष जफरअली खॉ महेमूद अली खॉ, ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले, इंडियन नॅशनल कॉग्रेसचे रविंद्र वसंतराव चव्हाण, राष्ट्रीय किसान कॉग्रेस पार्टीचे विष्णू मारोती जाधव, अपक्ष रुक्मीणबाई शंकरराव गिते, आम आदमी पार्टीचे जगजीवन तुकाराम भेदे, अपक्ष अब्दुल सलाम सल्फी यांनी अर्ज दाखल केले आहेत.

83-किनवट
किनवट विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 4 इच्छुकांनी 5 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 8 इच्छुकांनी 9 अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सीपीआय एमचे अर्जुन किशन आडे, भारतीय जनता पार्टीचे भिमराव रामजी केराम, नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे प्रदिप हेमसींग जाधव, बेबीताई प्रदिप जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे गोविंद सांबन्ना जेठेवार, भाजपाचे सचिन माधवराव जाधव,अपक्ष संदिप बाबुराव कऱ्हाळे,सपना सचिन जाधव यांचा समावेश आहे.

84-हदगाव
हदगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 3 इच्छुकांनी 3 अर्ज दाखल केले. तर आतापर्यंत 4 इच्छुकांनी 5 अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये इंडियन नॅशनल कॉग्रेसचे माधवराव निवृत्तीराव पवार, अपक्ष सुनिता माधव देवसरकर, रमाकांत दत्तात्रय शिंदे, देविदास नागनाथ स्वामी, बालाजी परसराम वाघमारे, नॅशनॅलीस्‍ट कॉग्रेस पार्टीचे व्यंकटेश मारोतराव पाटील, अपक्ष माधव दादाराव देवसकर, उमेश सिद्राम धोटे यांचा समावेश आहे.

85- भोकर
भोकर विधानसभेसाठी आज 3 इच्छुकांनी 3 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 4 इच्छुकांनी 5 अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अपक्ष मो ईलयास अब्दुल वहीद महोम्मद, अशोक माधवराव क्षीरसागर, विजयमाला ज्ञानेश्वर कपाटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे साहेबराव बाबा गोरठकर यांचा समावेश आहे.

86- नांदेड उत्तर
नांदेड उत्तरसाठी आज 3 इच्छुकांनी 3 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 3 इच्छुकांनी 4 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये रिपब्लीकन सेनाचे अकबर अख्तर खान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे सदाशिव व्यंकटराव आरसुळे, अपक्ष निसार शेख मकदुम यांचा समावेश आहे.

87 नांदेड दक्षिण
नांदेड दक्षिणसाठी आज 3 इच्छुकांनी 3 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 6 इच्छुकांनी 6 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अपक्ष भास्कर बालाजी हंबर्डे, संजय शिवाजी घोघरे, भारतीय युवा जन एकता पार्टीचे नय्यर जहां मोहम्मद फेरोज हुसैन, अपक्ष लतीफखान पीरखान पठाण, मिलिंद दिनाजी शिराढोणकर, वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद इकबाल अहमद यांचा समावेश आहे.

88-लोहा
लोहा विधानसभेसाठी आज एका इच्छुकानी दोन अर्ज सादर केले. आतापर्यंत 3 इच्छुकांनी 5 अर्ज सादर केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सेवा जनशक्ती पार्टीचे प्रा. मनोहर बाबाराव धोंडे, भारतीय जनता पार्टीचे चिखलीकर प्रतापराव गोविंदराव, शिवसेना (उबाठा)चे एकनाथ रावसाहेब पवार यांचा समावेश आहे.

89-नायगाव
नायगावमध्ये आज 3 इच्छुकांनी 3 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 4 इच्छुकांनी 4 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी राजेश संभाजीराव पवार, गजानन तानाजी श्रीरामवार, अपक्ष पुनम राजेश पवार, गजानन शंकरराव चव्हाण यांचा समावेश आहे.

90-देगलूर
देगलूर विधानसभेसाठी आज 4 इच्छुकांनी 5 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 7 इच्छुकांनी 8 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे सुभाष पिराजीराव साबणे, भारतीय जनता पार्टीचे जितेश रावसाहेब अंतापूरकर, अपक्ष यादव धोंडीबा सोनकांबळे, चांदू हाणमंतराव सोनकांबळे दरेगावकर, भारतीय जनता पार्टीचे जया बाळू राजकुंडल, राष्ट्रीवादी कॉग्रेस पार्टी (श.प.गट)चे सुजित रामचंद्र कांबळे, अपक्ष विश्वंभर जळबा वरवंटकर यांचा समावेश आहे.

91-मुखेड
मुखेडसाठी आज एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत 3 इच्छुकांनी 5 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये इंडियन नॅशनल कॉग्रेसचे पाटील हनमंतराव व्यंकटराव, भारतीय जनता पार्टीचे तुषार गोविंदराव राठोड, शिवसेना उबाठाचे दशरथ मंगाजी लोहबंदे यांचा समावेश आहे.
00000
#विधानसभानिवडणूक२०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *