पवित्र वेदमंत्र उदघोशात 101 महायज्ञ् कुंडी ने नित्य योग शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

@ नांदेड भूषण योगाचार्य सिताराम सोनटक्के यांना योगसाधकां कडून “गुरु गौरव” सन्मान. …!

@यज्ञविधित 151 यजमानांचा सहभाग

नांदेड: ( दादाराव आगलावे )

जगभरात सोशल मीडिया द्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचलेल्या आणि पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत भारतात नंबर एक ठरलेल्या नित्ययोग, भक्ती लॉन्स शाखेचा पहिला वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी समाज उन्नती, आरोग्य समृद्धी आणि विश्वशांतीसाठी 101 महा यज्ञ कुंडी चे आयोजन करण्यात आले होते. यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. 151 योगसाधकांनी या यज्ञ सोहळ्यात तन मन आणि धनाने सहभाग नोंदवून आपल्या योग शाखेचा पहिला वर्धापन दिन पवित्र मंत्र उदघोषाने साजरा केला.

कार्यक्रमाच्या आरंभी रेवनसिद्ध स्वामी यांनी शंख नाद करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्या नंतर यज्ञ पंडित अनिल आर्य,नारायण कुलकर्णी यांनी वेद मंत्राचे पठण करून यज्ञविधी संपन्न केला.

 

गेल्या पंधरा वर्षापासून पतंजली योगाचा सहवास लाभलेले योगाचार्य सिताराम सोनटक्के यांनी मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोफत योग वर्ग सुरू केला होता. या योग वर्गाचा आता वटवृक्ष झाला असून एकही दिवस सुट्टी न घेता किमान 250 ते 300 योग साधक नित्य नियमाने योगाभ्यासासाठी भक्ती लॉन्स येथे सकाळी 5 ते 7 या वेळेत येतात. या योगाचा शेकडो योग साधकांना फायदा झाला याचे ऋण म्हणून योगाचार्य सिताराम सोनटक्के यांना “नांदेड भूषण पदवी” सह “गुरु गौरव” ने सन्मानित करण्यात आले.

योगसाधक तथा आमदार बालाजी कल्याणकर यांची भेट:

कार्यक्रम प्रसंगी स्वतः योगसाधक असलेले आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी कार्यक्रमास भेट देऊन यज्ञविधी मध्ये सहभाग नोंदवला व उपस्थित यज्ञविधी यजमानांवर पुष्पवृष्टी केली.तसेच अनेक उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक ग्रामगीता प्रचारक बालाजी गादेवार यांनी आपले योगमय मनोगत व्यक्त करून निरोगी राहण्यासाठी रोज योग करण्याचे उपस्थिताना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग साधक दिलीप माने व घोलप गुरुजी यांनी केले. उपस्थितांचे आभार येथे योग समितीचे उपाध्यक्ष सदाशिवराव बुटले पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली नित्य योग समिती भक्ती लॉन्स चे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी, सदस्य व शेकडो योग साधकांनी अथक परिश्रम घेतले. योगगुरु सितारामजी सोनटक्के गुरुजी यांच्या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *