कंधार ; प्रतिनिधी
कंधार शहरातील शिवाजीनगरात एमेकर परिवाराच्या गोकुळ निवासस्थानी हस्तकलेतून डिकमाळ उर्फ दीपमाळ मेडीकलच्या कागदी खोक्या पासून आकर्षक डिकमाळ तयार करुन लावण्यात आली . दिवाळी उत्सवा निमित्य आकाश कंदील तयार करण्याची पध्दत होती हल्लीच्या अधुनिक युगात ही लोप पावत चालली आहे.पण कंधार शहरातील शिवाजीनगरातील सुंदर अक्षर कार्यशाळेनी आपली कल्पक वृत्ती जोपासत डिकमाळ तयार करून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार च्या वतीने दत्तात्रय एमेकर यांनी दीपोत्सव आरंभ केला आहे .
आपल्या भारतात पौराणिक व ऐतिहासिक काळापासून देवदिवाळी म्हणजे दीपोत्सवाचे प्रकाश पर्व मोठ्या प्रमाणात साजरे होते.भारतातल्या महादेवाच्या ज्योतिर्लिंग मंदिरात अन् जवळपास सर्व मंदिर परिसरात मंदिराच्या थोडे दुरवर डिकमाळ उभारण्यात येते.याचे कारण मंदिरास दिव्यांच्या रोषणाई मुळे मंदिर परिसर प्रकाशाच्या तेजात दिपून जात असे, पण दिवाळी सणाच्या निमित्य प्रत्येक निवासस्थानी घरावर आकाश कंदिल उभारुन घरासमोर दिव्यांची रोषणाई करुन दीपावली साजरी करण्याची प्रथा असते पण कंधार शहरातील शिवाजीनगरात एमेकर परिवाराच्या गोकुळ निवासस्थानी हस्तकलेतून डिकमाळ उर्फ दीपमाळ मेडीकलच्या कागदी खोक्या पासून आकर्षक डिकमाळ तयार करुन परमपरात आकाश कंदील तयार करण्याची पध्दत होती हल्लीच्या अधुनिक युगात ही लोप पावत चालली आहे.पण कंधार शहरातील शिवाजीनगरातील सुंदर अक्षर कार्यशाळेनी आपली कल्पक वृत्ती दाखविण्याच्या कार्याने विविध उपक्रम राबविण्याचा हातखंड आहे.
धंन्वतरी म्हणजे देवतांचे वैद्यराज आयुर्वेदाची देवता धन्वंतरी देवतेची जयंती म्हणजे धनत्रयोदशी दिनी गेल्या २०१५ च्या धन्वंतरी दिनी कंधार येथील हिंदु स्मशानभूमीत १०१ दीप लावून दिवाळी याच दिवशी केली होती. या वर्षी सर्व डाॅक्टर मंडळींना धन्वंतरी दिनाच्या सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार च्या वतीने दत्तात्रय एमेकर यांनी सदिच्छा दिल्या .