कंधार ; दिगांबर वाघमारे
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत व त्याचे वेळापत्रक जारी केले आहे. दिनांक 04.11.2024 रोजी वेळ सकाळी 09.45 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. अशी माहिती अरुणा संगेवार निवडणुक निर्णय अधिकारी 88 लोहा विधानसभा मतदार संघ यांनी दिली .
लोहा विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर पर्यंत एकूण ३५ उमेदवारांनी ५४ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते पैकी दि ३० ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येऊन ३५ पैकी ३३ उमेदवार वैध तर २ उमेदवार अवैध ठरले आहेत .
आता ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेता येणार आहे. त्यांनतर मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदान २० नोव्हेंबरला आणि, मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.
#विधानसभानिवडणूक२०२४