नांदेड प्रतिनिधी;
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट , १९२०— १८ जुलै , १९६९) हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णा भाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
अशा या महान जागतिक किर्तीच्या साहित्यिकांच्या वारसांना नांदेड येथील, ग्रंथ प्रेमी, सुप्रसिद्ध चित्र चारोळीकार, निवेदक, गायक, समीक्षक, मिमिक्रीकार, मानवी कल्याणाचा बादशहा, गोरगरीब जनतेची हेल्पलाईन, नेहमीच सामाजिक कार्यात तत्पर असणारे युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या कुटूंबियांना पाच हजार रुपये आर्थिक मदत केली.