भारतीय लोकशाहीची रचनाच अशी सुंदर आहे की त्यात *नेत्यांपेक्षा मतदाराला जास्तीत जास्त किंमत दिलेली आहे.* त्यामुळेच पाच वर्ष गाडीचा काच सुद्धा खाली न घेणारे नेते *पार कमरेतून वाकून तर कधी कधी मतदारांसमोर जमिनीवर लोळत साष्टांग दंडवत घालताना आपल्याला दिसून येतात.* त्यामुळेच लोकशाहीमध्ये निवडणुकीत उभे राहणे जसे लोकशाहीचा भाग आहे तसेच *मतांचा अधिकार बजावणे हा सुद्धा लोकशाही निवडणूक प्रक्रियेचाच एक भाग आहे.* गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात धुमाकूळ घालणारे *मनोज दादा जरांगे पाटील यांनी त्यांची चुणुक लोकसभेला दाखवून दिली.*
यावेळी विधानसभा निवडणुकीत काही मतांची गणिते जुळवून उमेदवार उभे करता येतील का याची चाचपणी मनोज दादांनी केली. परंतु जेव्हा समीकरण जुळत नाही असे दिसताच मनोज दादांनी निवडणुकीतून माघार घेतली व उमेदवार देण्याचा निर्णय रद्द केला. *कारण निवडणुकीचे सध्याचे स्वरूप एवढे बदलले आहे की त्यात केवळ मतांची समीकरणे जुळवून जमत नाही तर त्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ सुद्धा असावे लागते.* त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील यांनी घेतलेला कालचा निर्णय हा अत्यंत व्यावहारिक आहे. थोडक्यात लोकशाहीमध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करणे या एका प्रक्रियेतून मनोज दादा जरांगे यांनी माघार घेतलेली आहे. *पण यामुळे काही पक्षांचे पाळलेले लोक अशा पद्धतीने भुंकत आहेत की जणूकाही मनोज दादांनी सपशेल शरणागतीच पत्करली आहे.*
या भुंकणाऱ्या लोकांना एक मात्र कळत नाही की निवडणूक प्रक्रियेतील उमेदवार उभे करणे हे जसा एक टप्पा आहे *तसाच उभे राहिलेल्या योग्य उमेदवाराला मतदान करणे हा सुद्धा भारतीय निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो अजूनही मनोज दादा जरांगे यांच्या हातात आहे.* तेव्हा जणू काही मनोज दादा जरांगे यांनी सपशेल शरणागती पत्करली अशा पद्धतीने ऊरबडवेपणा जो चालू आहे तो या पाळलेल्या लोकांनी तात्काळ बंद करावा. *मराठा समाज आणि गरजवंत वंचित समाजाने सुद्धा आपला पराभव झाला अशा मानसिकतेत न राहता आता आपल्या हातात कुणाला निवडून द्यायचे आणि कुणाला पाडायचे याची ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या आधारे आहे हे ओळखून अत्यंत आत्मविश्वासाने मनोज दादा जरांगे यांच्या सोबत राहावे.* कारण या निवडणुकीत नेते खऱ्या अर्थाने राजा नाहीत *तर मतदार हेच आपले खरे राजे आहेत… कारण त्यांच्याकडे कुणाला विधानसभेत पाठवायचे आणि कुणाला घरी बसवायचे याचा फार मोठा अधिकार अजूनही बाकी आहे.* तेव्हा कुणाच्याही भुंकण्याने विचलित न होता मराठा आणि गरजवंत समाजाने मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे व हा आरक्षणाचा लढा असाच पुढे चालू ठेवावा.
*@ डॉ बालाजी जाधव, छत्रपती संभाजीनगर*
मो. 9422528290