लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

*लोहा ८८ मतदारसंघात बहुरंगी लढत होणार*

*विद्यमान आमदार,माजी आमदार यांच्यासह १९ जणांची माघार*

*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*

लोहा विधानसभा मतदारसंघात ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी आज अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर १९ उमेदवार लोहा मतदारसंघाच्या रिंगणात आहे. त्यामुळे लोहा कंधार ८८ मतदार संघामध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळणार.लोहा विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांनी आपला अर्ज कायम ठेवत महाविकास आघाडीला धक्का देत उमेदवारी कायम ठेवली आहे,

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं १५ ऑक्टोबर रोजी जाहीर केली होती. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडत आहे. ८८ लोहा कंधार मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ नोव्हेबंर ते २९ नोव्हेबंर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत तालुक्यातील जवळपास ३३ उमेदवारांचे ५४ फॉर्म या मतदारसंघात अर्ज दाखल केले होते. उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे. त्यानुसार १४ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत.

लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या आशाताई शिंदे यांनी शेकापकडून अर्ज दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर या बहिण-भावात ही निवडणूक रंगणार आहे.तर शिवसेनेचे उबाठा गटाचे एकनाथ पवार यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे येथे बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. चंद्रसेन पाटील जनहित लोकशाही पार्टी, शिवकुमार नरंगले वंचित बहुजन आघाडी,सुभाष कोल्हे संभाजी ब्रिगेड पार्टी,लोहा विधानसभा मतदारसंघात १४ पैकी ८ उमेदवार अपक्ष आहेत आशा शामसुंदर शिंदे,एकनाथ जयराम पवार,पंडित वाघमारे,प्रकाश बगणुरे,बालाजी चुकूलवाड,प्रा.मनोहर धोंडे,सुरेश मोरे,संभाजी पवळे हे अपक्ष निवडणुकीला समोरे जाणार आहेत.लोहा विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांनी आपला अर्ज कायम ठेवत महाविकास आघाडीला धक्का देत उमेदवारी कायम ठेवली आहे.

२०१९ ला शेकाप पक्षाकडून निवडून आलेले विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यासह माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य समिती पक्षप्रमुख, शेतकरी नेते शंकर आण्णा धोंडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्यामुळे कंधार मतदार संघात सख्या बहिण – भावात लढत अटळ व अत्यंत चुरशीची होणार, याबद्दल राजकीय गटात चर्चा सुरू झाली आहे. दोघांच्या मत विभाजनाचा महविकास आघाडीतील उमेदवाराला फायदा होऊ शकतो असे राजकीय गणित मांडण्यात येऊ लागले आहे.

 

*अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण प्राप्त अर्ज नामनिर्देशन*

एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र -३५ एकूण अपात्र नामनिर्देशन पत्र -२ एकूण वैध – ३३ माघार अर्ज – १९. निवडणूक लढविण्यास पात्र उमेदवार -१४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *