(कंधार ; दिगांबर वाघमारे )
भारत निवडणुक आयोगाचे मतदान केंद्र सुसुत्रीकरण करण्याचे दि २३ जुलै २०२४ च्या आदेशाअन्वये ८८ – मतदारसंघातील मतदान केंद्र हे जुन्या मतदान केंद्राच्या ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे तसेच मुबलक जागा नसल्यामुळे जुने सहा मतदान केंद्र नजीकच्या सुव्यवस्थीत शासकीय आस्थापनाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत.मतदारांनी मतदान केंद्र स्थलांतरीत ठिकाणाबाबत माहिती घ्यावी असे आवाहन ८८-लोहा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा संगेवार यांनी केले .
मतदारांना मतदान केंद्र स्थलांतरीत ठिकाणाबाबत माहिती माहिती होणेसाठी तपशिल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे. तरी संबंधित केंद्रावरील मतदारांनी लक्षपुर्वक वाचून आपले मतदान ज्या मतदान केंद्रावर आहे तेथे जावून दिनांक- २० नोव्हेबर२०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करावे. आपल्या जुन्या मतदान केंद्रावर सदर मतदान केंद्र कोणत्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहे त्याचा तपशिलही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
सर्व मतदारांना याद्वारे आपला मतदानाचा हकक् शंभर टक्के बजावण्यासाठी आवाहन ही निवडणूक निर्णय अधिकारी ८८-लोहा मतदार संघ अरूणा संगेवार व
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे यांनी केले आहे .
जुने मतदान केंद्र क्रमांक-२१२ – जि.प.कें.प्रा.शाळा पश्चिम बाजू कंधार स्थलांतरीत झाले असून सध्याचे मतदान केंद्र क्रमांक-२१६- श्री गणपतराव मोरे विदयालय कंधार(पश्चिम उत्तर बाजू असा आहे .
जुने मतदान केंद्र क्रमांक-२१३-जि.प.कें.प्रा.शाळा मध्य बाजू कंधार बदलून मतदान केंद्र क्रमांक-२१७- श्री गणपतराव मोरे विदयालय कंधार (पश्चिम दक्षिण बाजू)
जुने मतदान केंद्र क्रमांक-२१५ – जि.प. हायसकुल(मुलांचे) उत्तर बाजू कंधार बदलून मतदान केंद्र क्रमांक-२१९- श्री गणपतराव मोरे विदयालय कंधार (पूर्व बाजू) झाले आहे .
जुने मतदान केंद्र क्रमांक-२२१-नंदकिशोर दत्तात्रय बिडवई कनिष्ट महाविदयालय कंधार (पूर्व बाजू) बदलून नविन मतदान केंद्र क्रमांक-२२५- मनोविकास प्राथमिक शाळा कंधार (मध्य बाजू.) हे झाले आहे .
जुने मतदान केंद्र क्रमांक-२२९ -जि.प.हा.मुलीचे (मध्य बाजू) कंधार बदलून नविन मतदान केंद्र क्रमांक-२३३-श्री शिवाजी विधी महाविदयालय (पश्चिम बाजू) कंधार हे झाले .
जुने मतदान केंद्र क्रमांक-२३० जि.प.हा. (मुलींचे) दक्षिण बाजू कंधार याचे स्थलांतर होवून नविन मतदान केंद्र क्रमांक-२३४- श्री शिवाजी विधी महाविदयाल कंधार (पूर्व बाजू) येथे देण्यात आले आहे सदरील बदलाची या सर्व मतदान केंद्रावरील मतदारांनी नोंद घेवून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले .