गुदमार्गाच्या ठिकाणी त्रास झाल्यास सुरुवातीलाच योग्य निदान करून उपचार केल्यास केवळ औषधानी कमी होतो ऑपरेशनची किंवा इतर गोष्टीची आवश्यकता पडत नाही-  डॉ.विश्वंभर पवार निवघेकर

 गुदमार्गाच्या ठिकाणी त्रास झाल्यास सुरुवातीलास तज्ञ डॉटर ला दाखवून संडासाच्या जागेची तपासणी करून *मुळव्याध, भगंदर, फिशर,* संडासाची जागा छोटी होणे, खाजणे, कोरडी होणे, Prolaps, Polyps इत्यादी पैकी योग्य निदान करून उपचार केल्यास केवळ औषधी उपचारांनी कमी होतो. ऑपरेशनची किंवा इतर गोष्टीची आवश्यकता नसते.

पण रुग्ण सुरुवातीलाच शरमेमुळे, February, संकोचित भावनेमुळे तज्ञ डॉक्टर ला दाखविण्यास टाळाटाळ करतो. व गावठी उपचार, घरगुती उपचार, झाडपाला, वर्तमान पत्रातील जाहिराती वाचून, मोबाईल वरील माहिती वरून, कोणाच्या सांगण्यावरून व मेडिकल वरच्या गोळ्या खावून उपचार करतो.

 वरील उपचाराने तात्पुरता लाक्षणिक फायदा होतो. म्हणजे लक्षणे कमी होतात पण व्याधी हा कमी होत नाही. तो हळूहळू पुढील अवस्थेत जातो आणि गंभीर स्वरूप धारण करतो.

 मुळव्याध असेल तर त्याचा योग्य उपचार न झाल्यामुळे व बराच कालावधी झाल्यामुळे त्या कोंबाचा आकार, संख्या वाढते व तो कोंब खोलवर रुजला जातो. फिशर असेल तर तो खोलवर किंवा डीप होतो आणि anterior आणि posterior असा दोन्ही भागात होतो. भगंदर असेल तर त्याची ओपनिंग किंवा चिद्र यांची संख्या वाढत जाते. संडासाची जागा छोटी झाली तर ती आणखी छोटी होते.

अशा प्रकारे व्याधीचे वेळीच योग्य निदान व उपचार न झाल्यास तो व्याधी पुढील अवस्थेत जातो व अशा अवस्थेत ऑपरेशनची आवश्यकता भासते.

 

*🩺डॉ. विश्वंभर पवार*

*🩺डॉ. सुरेखा पवार *
*🏥🏥निवघेकर आयुर्वेदिक हॉस्पिटल*
*डॉक्टर्स प्लाझा,*
*डॉक्टर्स लेन नांदेड*
*📞मो. 9881166777*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *