शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकनाथ दादा पवार यांच्या प्रचारार्थ ९ तारखेला लोह्यात सभा ..! शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांचा विजय निश्चित – माजी आ. रोहिदास चव्हाण

 

(कंधार प्रतिनिधी ;  संतोष कांबळे )

कंधार लोहा मतदार संघात शिवसेना उबाठा, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टी, आम आदमी, रिपाइं या महाविकास आघाडीचे लोहा विधानसभेचे अधिकृत उमेदवार एकनाथ दादा पवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात होणार असल्याची माहिती लोहा विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांनी लोहा येथील त्यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात दिली.

यावेळी शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे लोहा कंधार चे माजी आमदार रोहिदास चव्हाण, शिवसेनेचे लातुर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय ढेपे, काँगेस चे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोहा तालुकाध्यक्ष प्रा. प्रभाकर पाटील पवार,शिवसेनेचे लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेबराव पाटील काळे, माजी पं.स. सदस्य नवनाथ उर्फ बापू चव्हाण माजी नगरसेवक बालाजी परदेशी,काँग्रेसचे कंधार न.पा.चे माजी नगरसेवक शहाजी नळगे,शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम, शिवसेनेचे लोहा -कंधार समन्वयक सुरेश पाटील हिलाल,सुप्रसिद्ध निवेदक विक्रम कदम सर, शिवसेनेचे लोहा तालुकाप्रमुख संजय पाटील ढाले, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल शेटकर,शिवसेनेचे कंधार तालुकाप्रमुख सचिन पेटकर,शिवसेनेचे लोहा शहरप्रमुख खंडू पाटील पवार, शिवसेनेचे कंधार शहरप्रमुख अतुल पापीनवार,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश पाटील नंदनवनकर, युवा सेनेचे लोहा -कंधार विधानसभा प्रमुख सतीश पाटील बाबर, युवा सेनेचे लोहा अधिकारी गजानन पाटील मोरे, युवक काँग्रेसचे बाबासाहेब पाटील बाबर,रूद्रा पाटील भोस्कर, सरपंच रामेश्वर पाटील पवार, बाबाराव पाटील, दत्ता शेटे, सुभाष पाटील भालेराव, प्रकाश चव्हाण, भीमराव पाटील शिंदे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना एकनाथ दादा पवार म्हणाले की, लोहा -कंधार मधील वातावरण हे महाविकास आघाडी सोबत आहे. मी माजी आमदार रोहीदास चव्हाण यांचे स्वागत करतो त्यांनी माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले त्यांनी १९८८ पासून लोहा -कंधार तालुक्यात गाव वाडी तांड्यावर शिवसेना पक्ष वाढविला. आज जी शिवसेना आहे ती त्यांच्या कामाची पावती आहे.
लोहा -कंधार मध्ये महाविकास आघाडीचा विजय होणार आहे व यापुढच्या न.पा.,जि.प. ,पं.स. च्या निवडणुका या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविणार आहे असे एकनाथ दादा पवार म्हणाले.

*शिवसेना महाविकास आघाडीचे लोहा विधानसभेचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांचा विजय निश्चित -माजी आ. रोहिदास चव्हाण*

यावेळी बोलताना माजी आमदार रोहिदास चव्हाण म्हणाले की, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांचा विजय निश्चित आहे.
महाविकास आघाडीकडून एकनाथ दादा पवार यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर ही पहिलीच पत्रकार परिषद आहे.
महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला ढोबीपिछाड केले त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही बाजी मारेल व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल . महाराष्ट्राची औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रासहित सर्वचजागी पिछाडीवर गेला आहे.
लोहा -कंधार मतदार संघात एकनाथ दादा पवार हे निश्चितच आमदार होतील. शिवसेनेची बांधणी झाली आहे त्यांच्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लिम बांधव, आंबेडकरी जनता सर्वच आहेत .त्यांना सर्वाचे सहकार्य आहे असे माजी आ. रोहिदास चव्हाण म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम सर यांनी केले तर आभार काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *