(नांदेड ; दिगांबर वाघमारे )
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, मुंबई यांनी धुळे जिल्हयातील मौजे भोईटी शिवार, ता. शिरपुर येथे सव्वा दोन एकर शेतीमध्ये पेरलेला ‘गांजा’ यावर छापा टाकुन एकुण २८१६.५ किलो वजनाचा किं.अ. ५.६३ कोटीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला . आरोपी विरुद्ध ४४/२०२४, कलम ८ (क), २० (क), २९ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
थोडक्यात हकिगत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, बांद्रा युनिट, गुन्हे शाखा, मुंबई च्या पोलीस पथकाने दिनांक १५/०८/२०२४ रोजी साकिनाका, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे ‘गांजा’ विक्री करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. आरोपींचे ताब्यातून एकूण ४७ किलो ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपीविरूध्द अं.प.वि. कक्ष गु.र.क्र. ४४/२०२४, कलम ८ (क), २०(क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमूद गुन्हयातील अटक आरोपी क. १ याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याने धुळे जिल्हा येथे राहणारा नमुद पाहिजे आरोपी क. २ याचेकडुन गांजा हा अंमली पदार्थ घेतला असल्याचे सांगितले होते. त्यावरुन गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने नमुद पाहिजे आरोपीचा शिरपुर, धुळे जिल्हा येथे शोध घेता नमुद पाहिजे आरोपीताचे मालकीचे भोईटी शिवारात, ता. शिरपुर, जि. धुळे येथे सव्वा दोन एकर शेतीमध्ये लागवड केलेला ‘गांजा’ मिळुन आला. एकुन २७७४ किलो वजनाची गांजा या वनस्पतीची झाडे व ४२.५. किलो वजनाचा ओलसर / सुका गांजा असा एकुन २८१६.५ किलो वजनाचा कि.अं. ५.६३ कोटी किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असुन नमुद गांजा शेतीची लागवड करणारा पाहिजे आरोपीचा शोध चालु आहे.
अशा प्रकारे अंमली पदार्थ विरोधी कक्षाने यांनी धडक कारवाई करत भोईटी, ता. शिरपुर, जिल्हा धुळे येथे ‘गांजा’ ची लागवड केलेली शेती शोधुन त्यावर कारवाई करुन सदरवेळी एकूण २८१६.५ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ एकूण अं. किं.रू. ५.६३,००,०००/- पेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी ही श्री. विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री. शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, श्री. दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त, प्रकटीकरण, गुन्हे शाखा, मुंबई, व श्री. सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, बांद्रा युनिटचे वरिष्ठ पो.नि. श्री. जिवन खरात यांचे नेतृत्वाखाली, प्र.पो.नि. राजेंद्र दहिफळे, पो.नि. नितीन केराम, पो.नि. सुरेश भोये, पो.नि. रविंद्र मांजरे, सपोनि. श्रीकांत कारकर, सपोनि. अमोल कदम, पो.उ.नि. कुलकर्णी, पोउनि. फाळके व स्टाफ या पथकाने केली आहे.